महापालिका आयुक्तांच्या चारचाकी गाडीला चक्क ट्रिपल सीटचा दंड

पिंपरी चिंचवड : ‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण आता पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी खरी करून दाखवली आहे. चक्क चारचाकी वाहनाला ट्रिपल सीट चालवत असल्याचा दंड ठोठावण्यात आलाय. होय, हा पराक्रम पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केलाय. यामुळे मोठी चर्चा सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या चारचाकी गाडीला हा दंड …

महापालिका आयुक्तांच्या चारचाकी गाडीला चक्क ट्रिपल सीटचा दंड

पिंपरी चिंचवड : ‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण आता पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी खरी करून दाखवली आहे. चक्क चारचाकी वाहनाला ट्रिपल सीट चालवत असल्याचा दंड ठोठावण्यात आलाय. होय, हा पराक्रम पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केलाय. यामुळे मोठी चर्चा सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या चारचाकी गाडीला हा दंड आकारण्यात आलाय, ती पिंपरी चिंचवडच्या महापालिका आयुक्तांची गाडी आहे.

मोठ्या थाटा-माटामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात पुणे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवर सीसीटीव्ही बसवण्यात आले. या सीसीटीव्हीच्या माध्यमाद्वारे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील ट्रॅफिक सिग्नलवर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईमधून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला जातो.

या सीसीटीव्हीमधील दंडामधून पुणे वाहतूक पोलिसांचा गलथान कारभार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या MH 14 CL 1599 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला चक्क ट्रिपल सीट या गुन्ह्यानुसार 200 रुपये दंड पुणे पोलिसकडून आकारण्यात आला आहे. चारचाकी गाडीला ट्रिपल सीटचा दंड आणि तेही थेट आयुक्तांची गाडी यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

एक ना अनेक चुका पुणे वाहतूक पोलिसांकडून झाल्याचं निदर्शनास आलंय. त्यामध्ये अजून एक भर म्हणजे दुचाकी वाहनांचा फोटो पुरावा म्हणून या चारचाकी वाहनाला लावल्याची सुद्धा एक घटना समोर आली आहे. वाहन क्रमांक MH 14 FU 0046 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला नोपार्किंग आणि फॅन्सी नंबर प्लेट लावल्याबद्दल तब्बल 1200 रुपयांचा दंड करण्यात आला. हा दंड पुणे वाहतूक पोलीस वसूल करणार आहेत.

याच कार्यपद्धतीवर मात्र पुणेकर नागरिक नाराज होताना दिसत आहेत. यामुळे पुणे वाहतूक पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. या सर्व प्रकाराकडे पाहताना अशा मोठ्या वाहनांना चुकीच्या पद्धतीने दंड आकारणी होत असेल तर पुण्यामधील असंख्य वाहनांवर कुठल्या प्रकारचे चुकीचे दंड आकारले जात असतील याची कल्पना न केलेलीच बरी.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *