पुण्यातील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा जेरबंद

शहरातील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Nobel Hospital Blast threat, पुण्यातील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा जेरबंद

पुणे : शहरातील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत (Nobel Hospital Blast threat). प्रवीण हिराचंद कुंभार असं आरोपीचं नाव आहे. तो मुळचा बारामतीमधील झारगडवाडीचा रहिवासी असून सध्या भेकराईनगर येथे राहत होता. विशेष म्हणजे आरोपी प्रवीणने हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देताना 10 लाख रुपयांची खंडणी देखील मागितली होती.

आरोपी प्रवीण उच्चशिक्षित असून त्याने एमएससी फिजिक्सपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. मागील काही महिन्यांपासून नोकरी नसल्यामुळे तो नैराश्यात होता. त्यामुळे त्याने पैसे मिळवण्यासाठी नोबेल हॉस्पिटल उडवून देण्याचा मेल पाठवला. एकदा मेल पाठवूनही तो थांबला नाही. त्याने काही दिवसांनी पुन्हा एकदा धमकीचा मेल पाठवला. तसेच खंडणी न मिळाल्यास हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर हॉस्पिटल प्रशासनासह रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

धमकी दिल्यानंतर सायबर विभागाने तपास केला असता संबंधित मेल गोवा राज्यातून केल्याचं निष्पन्न झालं. तांत्रिक तपासानुसार सायबर विभागाने प्रवीणला वाईतून ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रवीणचं लग्न झालं असून त्याने गोव्याला फिरायला जाण्यासाठी वडिलांकडून पैसे घेतले होते. त्यानंतर गोव्यातून प्रवीणने इंटरनेटची सातस्तरीय सुरक्षा भेदून बनावट मेलआयडी तयार केला. त्यानुसार खंडणी मागण्यासाठी संबंधित मेलद्वारे नोबेल हॉस्पिटलला मेल पाठवल्याचं तपासात निष्पन्न झालं, अशी माहिती सायबर क्राईमचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सायबर पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, शिरीष गावडे, प्रवीणसिंग राजपूत, संतोष जाधव, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Nobel Hospital Blast threat

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *