निकृष्ठ कामं चव्हाट्यावर, डिंभे धरणाचा कालवा सलग दुसऱ्या वर्षी फुटला

आंबेगावमधील चास येथे डिंभे धरणाचा डावा कालवा फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Dimbhe Dam canal leakage in Ambegaon, निकृष्ठ कामं चव्हाट्यावर, डिंभे धरणाचा कालवा सलग दुसऱ्या वर्षी फुटला

पुणे : आंबेगावमधील चास येथे डिंभे धरणाचा डावा कालवा फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Dimbhe Dam canal leakage in Ambegaon). यात जवळपास 15 शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तीन जणांची घरं पाण्याने वेढली गेली आहेत. या घरांभोवती तळं साठल्याची स्थिती तयार झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील चास गावात हा सर्व प्रकार घडला. यावर प्रशासनाकडून अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचं दिसत नाही.

विशेष म्हणजे मागील वर्षी देखील 7 फेब्रुवारीला या कालव्यातून पाणी गळती झाली होती. त्यानंतर मार्च 2019 मध्ये हा कालवा फुटला होता. त्यावेळी देखील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून आज पुन्हा हा कालवा फुटण्याची नामुष्की आली. यात स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

या कालवा फुटीमुळे आजूबाजूच्या शेतीत पाणी घुसलं आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतातील मातीही मोठ्या प्रमाणात वाहून गेली. काही शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. वारंवार या घटना होत असतानाही प्रशासन ठिम्म असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

अशा घटनांमध्ये नागरिकांचा जीव केल्याशिवाय सरकार घेणार की नाही, असाही संतप्त सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. आता सरकार या निष्काळजीपणावर काय कारवाई करणार आणि अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार हे पाहावे लागणार आहे.

Dimbhe Dam canal leakage in Ambegaon

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *