वंचित आघाडीत बिघाडी, प्रकाश आंबेडकर संघ-भाजप धार्जिणे : लक्ष्मण माने

लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांविरोधात कठोर भूमिका घेऊन त्यांच्याविरोधात बंड केलं. प्रकाश आबंडेकरांचा निर्णय हा भाजपधार्जिणा असल्याचा आरोप लक्ष्मण माने यांनी केला.

वंचित आघाडीत बिघाडी, प्रकाश आंबेडकर संघ-भाजप धार्जिणे : लक्ष्मण माने

 पुणे : वंचित आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत काम करू शकत नाही असा पवित्रा वंचितचे नेते लक्ष्णन माने यांनी घेतला आहे. लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांविरोधात कठोर भूमिका घेऊन त्यांच्याविरोधात बंड केलं. प्रकाश आबंडेकरांचा निर्णय हा भाजपधार्जिणा असल्याचा आरोप लक्ष्मण माने यांनी केला. तसेच प्रकाश आबेडकरांनी राजीनामा द्यावा अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबडेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. शिवाय प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावे, असंही लक्ष्मण माने म्हणाले.

लक्ष्मण माने काय म्हणाले?

“वंचित बहुजन आघाडी मी सुरु केली होती आणि आता यापुढे मीच तिला पुढे नेणार असंही माने यावेळी म्हणाले. वंचित आघाडी हा आमचा गरिबांचा पक्ष होता. या पक्षाचं नेतृत्त्व आम्ही बाळासाहेबांकडे दिले. बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणून बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्याकडे नेतृत्व दिलं. बाबासाहेबांच्या प्रेमापोटी आम्ही श्रद्धेने त्यांच्यासोबत गेलो. मी ईश्वर मानत नाही, कोणाच्या पायाला हात लावत नाही पण बाळासाहेब त्याला अपवाद आहेत. बाबासाहेबांना आम्ही पाहिलं नाही, पण बाळासाहेबांना पाहिलं. त्यांच्याबद्दल आम्हाला श्रद्धा आहे. त्या भावनेने आम्ही त्यांच्याकडे गेलो. पण आमचा एकही माणूस निवडून आला नाही. 70 वर्षात भटक्या विमुक्तांचा एकही प्रतिनिधी संसदेत गेला नाही.

माझ्यामुळे सेना-भाजपला 10-12 जागा गेल्या

वंचित बहुजन आघाडीचं मोठं नुकसान झालं. आम्ही सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेलो. पण ते काही झालं नाही. सत्ता एकट्याच्या बळावर येत नाही त्यामुळे बाळासाहेबांसोबत गेलो. आमची ताकद दाखवली. दहा-बारा जागा येतील असं वाटत होतं, पण एकही जागा आली नाही. जागा आल्या भलत्यांच्याच. ज्यांना मी आयुष्यात मदत केली नाही त्या शिवसेना-भाजप आणि प्रतिगाम्यांना दहा-बारा जागा माझ्यामुळे गेल्या, असं मला वाटतंय. आयुष्यात मी असं कधी केलं नाही, त्यामुळे असं कसं झालं याचं मला दु:ख होतंय. यावेळी माझी चूक झाली. वंचित बहुजन आघाडीमध्ये मी गेलो त्यामुळे ती चूक झाली. आरएसएस-भाजपला माझ्यामुळे मदत झाली, त्यामुळे त्यांच्या 10-12 जागा निवडून आल्या. आमची एकही आली नाही. काँग्रेसच्या किती पडल्या आणि दुसऱ्यांच्या किती आल्या यात मला इंटरेस्ट नाही. त्यांच्या जागा पडल्या या त्यांच्या कर्माने पडल्या.

प्रकाश आंबेडकरांवर नाराज

प्रकाश आंबेडकरांचा स्वभाव, कामाची पद्धत लोकशाहीवादी नाही. मी गेल्या वर्षभरात हे अनुभवलं आहे. मोकळेपणाने काम करता येत नाही. घुसमट होतेय. त्यामुळे इथे राहण्यात अर्थ नाही, असं लक्ष्मण माने म्हणाले.

त्यांच्या कामाच्या पद्धती आहेत त्याचा विचार त्यांनी करायला हवा. आपल्याला जे काही करायचं आहे ते सर्वांनी मिळून करावं ही भूमिका लोकसभा निवडणुकीनंतर राहिली नाही. त्यामुळे समाज तुटत गेला. गैरसमज वाढत गेला. आता थांबण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे मी राजीनामा पाठवून दिला, असं लक्ष्मण माने यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *