माळेगाव निवडणूक : अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, सहकार बचाव पॅनलकडून मतमोजणीला आक्षेप

'सहकार बचाव पॅनल'च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतला. मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही पाहूनच मोजणी सुरु करण्याची मागणी तावरेंनी केली.

माळेगाव निवडणूक : अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, सहकार बचाव पॅनलकडून मतमोजणीला आक्षेप
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 11:12 AM

बारामती : बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काही काळासाठी लांबणीवर पडली होती. ‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप (Malegaon Sugar Factory Election Result) घेतल्यामुळे मतमोजणी थांबली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी काल (रविवार 23 फेब्रुवारी) मतदान झालं होतं, तर मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. तब्बल 92 टक्के मतदान झाल्याने निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.

निळकंठेश्वर पॅनल हा अजित पवार यांच्या समर्थकांचा आहे, तर विद्यमान सत्ताधारी सहकार बचाव पॅनल चंदरराव तावरे समर्थकांचा आहे. साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये 14 अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.

‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतला. मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही पाहूनच मोजणी सुरु करण्याची मागणी तावरेंनी केली.

45 टेबलवर मतमोजणी होत असून प्रत्येक टेबलवर एक मतपेटी उघडली जात आहे. उमेदवाराच्या प्रतिनिधींसमोर मतपेटी उघडून मतपत्रिका वेगवेगळ्या करुन मतमोजणी होत आहे.

निकाल ऐकण्यासाठी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्रावर गर्दी केली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पहिला निकाल हाती येईपर्यंत दुपारचे तीन वाजतील, असा अंदाज आहे. तर संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंच रात्रीचे नऊ वाजण्याची चिन्हं आहेत. (Malegaon Sugar Factory Election Result)

अजित पवार प्रचाराच्या मैदानात

गेल्या महिनाभरापासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरु होता. यासाठी अजित पवार स्वत: मैदानात उतरले होते. कारखान्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी अजित पवार यांनी कार्यक्षेत्रात जाऊन जोरदार प्रचारबाजी केली.

2015 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, असा चंगच अजित पवारांनी बांधला आहे.

शरद पवारांचा कारखाना

माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणूनच ओळखला जातो. शरद पवार हे या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत 1997 आणि 2015 च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला होता.

विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात कारखान्याच्या तांत्रिक बिघाडासह झालेल्या नुकसानीवर लक्ष्य करत सभासदांना सत्ता देण्याचं आवाहन केलं आहे. तर सत्ताधारी गटाकडून या हंगामात दिलेल्या जादा ऊसदरावर सभासदांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. (Malegaon Sugar Factory Election Result)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.