पुण्यात घाऊक औषध विक्रीसाठी दिवस ठरले, कोणत्या विभागात कधी विक्री?

पुण्यात औषध विक्री क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघटनेने हा निर्णय (Pune Wholesale Medicine Sale) घेतला आहे.

पुण्यात घाऊक औषध विक्रीसाठी दिवस ठरले, कोणत्या विभागात कधी विक्री?

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला (Pune Wholesale Medicine Sale) आहे. पुण्यातील मेडिकल क्षेत्रात कोरोनाची व्याप्ती वाढू लागली आहे. त्यामुळे आता घाऊक औषध विक्री फक्त ठराविक दिवशी आणि ठरलेल्या वेळेतच होणार आहे. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. औषध विक्री क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर कंपनीच्या मेडिकल प्रतिनिधींना घाऊक बाजारात येण्यास मनाई  केली. त्याशिवाय एमआरबरोबर सर्व व्यवहार ऑनलाईन होणार आहेत. तसेच रविवारी घाऊक विक्री बंद राहणार आहे. इतर दिवशीही सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत विक्री होणार आहे. यानुसार सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ठरलेल्या पहिल्या विभागात, त्यानंतर 3 ते 5 या वेळेत दुसरा ठरलेला विभाग आणि संध्याकाळी 5 ते 7 तिसऱ्या विभागात अशा प्रकारे औषध विक्री होणार आहे.

औषध विक्री क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघटनेने हा निर्णय (Pune Wholesale Medicine Sale) घेतला आहे. सदाशिव पेठेत घाऊक औषध विक्रेत्यासह 42 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. यानंतर कोथरूडच्या औषध विक्रेत्यालाही कोरोनाची बाधा झाली‌. त्यामुळे कधीही या आणि औषध घेऊन जा, या प्रवृत्तीला लगाम बसणार आहे. निर्बंध शिथिल झाल्यानं स्थानिक लोकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे बाहेरील लोकांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवण्यात आली.

पुण्यात कोणत्या वारी कोणत्या भागात घाऊक औषध विक्री?

  • सोमवार –

वाघोली, चंदन नगर, विमान नगर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे स्टेशन, बंडगार्डन, सासवड, फुरसुंगी, हडपसर, लोणी, मांजरी, कोंढवा, केशव नगर, मुंढवा, घोरपडी, मगरपट्टा सिटी, फातिमानगर, वानवडी, मुळशी, पिरंगुट

भोर, म्हाळुंगे, सुसरोड, पाषण, बाणेर, औंध, शिवाजीनगर, रेंज हिल, खडकी, गोखलेनगर, बावधन, जनवाडी, लॉ कॉलेज रोड, डेक्कन

  • मंगळवार –

पुणे कॅम्प, सर्व पेठा, कात्रज, धनकवडी, सहकार नगर,टिळक रोड, पर्वती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी

  • बुधवार –

पानशेत, खडकवासला, धायरी, वडगाव, सिंहगड रोड, लाल बहादूर शास्त्री रोड, नवी पेठ, भोर, सासवड, वारजे, मुळशी, पौड रोड, कर्वे रोड, शिवणे, उत्तम नगर, कर्वेनगर आणि कोथरुड

  • गुरुवार –

म्हाळुंगे, सुसरोड, पाषाण, बाणेर, औंध, शिवाजी नगर, रेंज हिल, खडकी, गोखलेनगर, बावधन, जनवाडी, लॉ कॉलेज रोड, डेक्कन

  • शुक्रवार –

वाघोली, चंदन नगर, विमान नगर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे स्टेशन, बंडगार्डन, सासवड, फुरसुंगी, हडपसर, लोणी, मांजरी, कोंढवा, केशव नगर, मुंढवा, घोरपडी, मगरपट्टा सिटी, फातिमानगर, वानवडी, मुळशी, पिरंगुट आणि भोर

  • शनिवार –

पानशेत, खडकवासला, धायरी, वडगाव, सिंहगड रोड, लाल बहादूर शास्त्री रोड, नवी पेठ, भोर,सासवड, वारजे मुळशी, पौड रोड, कर्वे रोड, शिवणे, उत्तम नगर,कर्वेनगर आणि कोथरूड

पुणे कॅम्प, सर्व पेठा, कात्रज, धनकवडी, सहकार, नगर टिळक रोड पर्वती मार्केट यार्ड बिबवेवाडी

(Pune Wholesale Medicine Sale)

संबंधित बातम्या : 

Pune Lockdown | पुण्यात सोमवारपासून घाऊक औषध विक्री सुरु, औषध विक्रीबाबत नियमावली जारी

Pune Corona | पुण्यात औषधांची घाऊक खरेदी-विक्री तीन दिवसांसाठी बंद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *