पुण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ

पुणे: पुण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. धायरी इथे जिवंत बॉम्ब सापडला. याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली आहे. सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडे हा बॉम्ब दिला. याप्रकरणी बीडीडीएस पुढील तपास करत आहेत. धायरीतील दळवीवाडी  इथे हा जिवंत बॉम्ब सापडला. पुढील तपास सिंहगड पोलीस स्टेशन करत आहे. हा बॉम्ब कुठून आला, …

पुण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ

पुणे: पुण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. धायरी इथे जिवंत बॉम्ब सापडला. याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली आहे. सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडे हा बॉम्ब दिला. याप्रकरणी बीडीडीएस पुढील तपास करत आहेत. धायरीतील दळवीवाडी  इथे हा जिवंत बॉम्ब सापडला. पुढील तपास सिंहगड पोलीस स्टेशन करत आहे.

हा बॉम्ब कुठून आला, कुणी ठेवला, त्यामागचा हेतू काय असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. गेल्याच महिन्यात महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे युनिटने चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली होती. त्या प्रकरणाचा आणि आज जिवंत बॉम्ब सापडण्याचा काही संबंध आहे का, यादिशेनेही तपास करणं आवश्यक आहे.

पिंपरीत गेल्या महिन्यात सापडलेला दहशतवादी कोण?

पिंपरीतील चाकणमधून एका दहशतवाद्याला अटक केली होती. हा खलिस्तान समर्थक दहशतवादी असल्याचा संशय होता. त्यावेळी आरोपीकडून देशी बनावटीची बंदूक आणि पाच राऊंड जप्त केले होते. त्याच्यावर UAPA कायद्यातंर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातमी

निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात संशयित दहशवादी पकडला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *