तरुणीशी गैरवर्तन करुन खंडणी उकळणाऱ्या तीन पोलिसांना अटक

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून महिला आणि मुलींवर अत्याचार, विनयभंग अशा विविध घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक पाऊलं उचलली जात आहेत. असं असताना चाकण उद्योगनगरीतील एक 21 वर्षीय मुलगीच पोलीस हवालदार आणि दोन होमगार्ड यांच्या जोर-जबरदस्तीची शिकार बनली असल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एका हवालदारासह दोन होमगार्डला अटक करण्यात आली आहे. …

, तरुणीशी गैरवर्तन करुन खंडणी उकळणाऱ्या तीन पोलिसांना अटक

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून महिला आणि मुलींवर अत्याचार, विनयभंग अशा विविध घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक पाऊलं उचलली जात आहेत. असं असताना चाकण उद्योगनगरीतील एक 21 वर्षीय मुलगीच पोलीस हवालदार आणि दोन होमगार्ड यांच्या जोर-जबरदस्तीची शिकार बनली असल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एका हवालदारासह दोन होमगार्डला अटक करण्यात आली आहे.

होमगार्डने पोलीस असल्याचं सांगत 21 वर्षीय मुलीला फोन करून बाहेर बोलावून घेतलं आणि दुचाकीवरुन पोलीस ठाण्यात नेण्याचा बहाणा करत तिच्याशी जोर-जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अजय भोसले, होमगार्ड यांच्यावर 354 अ विनयभंग आणि होमगार्ड समीर वाघोले, पोलीस शिपाई सागर मांडे या तिघांवर भा.दं.वि 385, 34 खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिघांनाही अटक करण्यात आली असली तरी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार होमगार्ड अजय याने संबंधित पीडित मुलगी घरी असताना तिच्या मोबाईलवर फोन केला. ‘मी अजय पोलीस बोलत असून, तुम्ही घराच्या खाली या, आपल्याला पोलीस चौकीला जायचं आहे. तू खाली नाही आली तर मी वरती रूममध्ये येतो’ असं त्याने फोनवर सांगितलं. त्यावेळी पीडितेने फोन ठेवला आणि ती खाली आली.

यावेळी रस्त्यावर लाल रंगाच्या दुचाकीवर अजय नावाचा पोलीस उभा होता. त्याने पीडितेला पोलीस चौकीवर जायचंय सांगून गाडीवर बसवले. त्यानंतर त्याने दुचाकी दुसऱ्याच रस्त्याने नेली आणि एका हॉटेलवर थांबवली. हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी तो पीडितेला घेऊन गेला.

फिर्यादीच्या माहितीनुसार, या हॉटेलवर जबरदस्तीने नाष्टा करण्यास भाग पाडलं. तरुणीला तोंडाला स्कार्फ बांधायला लावला आणि पोलिसाने स्वतःही तोंडाला रुमाल बांधला. दुचाकीवर बसलेले असताना त्याने तरुणीशी अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह वर्तन केलं. रस्त्यानेच या पोलिसाने तरुणीला जबरदस्तीने लॉजवर येण्यासाठी दमदाटी केली.

हा सर्व प्रकार लक्षात येताच पीडितेने आरडाओरड केली. पण भेटली नाहीस किंवा फोन घेतला नाही तर जीवे मारण्याची धमकी या तरुणीला देण्यात आली. अजय, समीर आणि सागर यांनी तरुणीकडे पाच हजार रुपयांचीही मागणी केली. त्यानुसार तिघांवर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *