AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangal Gochar 2023 : मे महिन्यात मंगळ बदलणार आपली रास, गोचरामुळे तीन राशींचे आर्थिक स्त्रोत होणार मोकळे

Mangal Gochar 2023 : ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह मे महिन्यात राशी बदल करणार आहेत. या बदलामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होतील. तीन राशींना मंगळ ग्रहाचं पाठबळ मिळेल.

Mangal Gochar 2023 : मे महिन्यात मंगळ बदलणार आपली रास, गोचरामुळे तीन राशींचे आर्थिक स्त्रोत होणार मोकळे
Mangal Gochar 2023 : 10 मे रोजी मंगळ ग्रह करणार कर्क राशीत प्रवेश, तीन राशींना मिळणार पाठबळ
| Updated on: Apr 14, 2023 | 3:28 PM
Share

मुंबई : एप्रिल महिन्यात ग्रहांची बरीच उलथापालथ होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु ग्रह वर्षाभरासाठी मेष राशीत गोचर करणार आहे. दुसरीकडे ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह राशी बदल करणार आहे. साहस, शौर्य, राग, शत्रू, अस्त्र-शस्त्र, दुर्घटना, आजार या घटनांचा मंगळ कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे मंगळाच्या गोचरामुळे काही राशींच्या जातकांवर परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह 10 मे 2023 रोजी राशी बदल करणार आहे. मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

सेनापती मंगळ ग्रह 10 मे रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी हा राशी बदल होईल. या राशीत मंगळ 1 जुलैपर्यंत ठाण मांडून बसणार आहे. त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करेल. तत्पूर्वी 10 मे ते 1 जुलै हा कालावधी काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. तर काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे.

मंगळ गोचरामुळे या राशीच्या जातकांना मिळणार लाभ

कन्या : या राशीच्या एकादश भावात मंगळ ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना मंगळाची साथ मिळेल. अडकलेली कामं मार्गी लागतील. आर्थिक स्थिती या काळात मजबूत होईल. याबरोबर उद्योग धंद्यात सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. असं असलं तरी कौटुंबिक वातावरण मात्र तणावाचं राहील. त्यामुळे जितकं शांत राहता येईल तितका प्रयत्न करा. कारण यामुळे वाद विकोपाला जाऊ शकतात.

कुंभ : मंगळ ग्रह या राशीच्या षष्टम भावात गोचर करणार आहे. त्यामुळे शत्रूपक्षावर मात मिळवणं सोपं होईल. इतकंच काय तर शत्रूपक्षाची पळता भूई थोडी होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. मात्र असं असलं तरी खर्चावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग जुळून येईल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल.

मीन : या राशीच्या पंचम भावात मंगळ गोचर करणार आहे. यामुळे जातकाच्या आर्थिक स्थिती बदल झालेला दिसून येईल. इतकंच काय तर गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. न्यायालयीन प्रकरणातही यश मिळेल असं ग्रहमान आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. बायकोचं आणि आईचं एकत्रित नांदणं सुखावह राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा