
मुंबई : पंचांगानुसार मकर राशीत मंगळाचे संक्रमण 05 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 09.07 वाजता होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो, जो 2024 मध्ये आपली राशी बदलणार आहे. मंगळाच्या राशीतील बदलामुळे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आव्हाने येऊ शकतात, तसेच त्यांना या काळात लाभ देखील मिळू शकतात. थोडक्यात चढ उतारांचा हा काळ असणार आहे. या काळात उन आणि सावलीचा अनुभव या जातकांना येणार आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ हा आठव्या घराचा स्वामी आहे. पंचांगानुसार मेष राशीच्या लोकांच्या 10व्या घरात मंगळाचे भ्रमण होणार आहे आणि पत्रिकेत 10वे घर नाव आणि कीर्तीचे आहे. मंगळाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना या काळात खूप मेहनत करावी लागू शकते. मेष राशीच्या लोकांना मंगळाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागला तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी मेष राशीच्या लोकांनी रोज हनुमान चालिसाचा पाठ करावा.
वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत मंगळ 7व्या आणि 12व्या घराचा स्वामी आहे. राशी बदलानंतर मंगळ वृषभ राशीच्या लोकांच्या 9व्या घरात प्रवेश करेल. मंगळाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक समृद्धी मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला सुवर्ण संधी मिळू शकतात. या काळात त्यांना कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. वैयक्तिक जीवनात तणाव असू शकतो, परंतु तो लवकरच दूर होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात शेंदूर सिंदूर अर्पण करावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)