मृत्यूआधी रावणाने लक्ष्मणाला दिला होता कानमंत्र, या गोष्टी आजही आहेत कामाच्या

आपल्या पुराणातसुद्धा याबद्दलचे अनेक दाखले देण्यात आलेले आहे. रामायण काळातील यशोगाथा पाहिल्यास अशीच एक घटना प्रसिद्ध आहे.

मृत्यूआधी रावणाने लक्ष्मणाला दिला होता कानमंत्र, या गोष्टी आजही आहेत कामाच्या
रावण
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2023 | 5:51 PM

मुंबई : यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, ज्ञान आणि चिकाटीची लागते. कधी कधी यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. म्हणूनच लोकं महान लोकांच्या जीवनातून धडे घेतात आणि यशाचे सुत्र (Success Tips) जाणून घेतात. महान लोकांचे जिवन हे एक प्रकरे यशाची गुरूकिल्लीच असते. आपल्या पुराणातसुद्धा याबद्दलचे अनेक दाखले देण्यात आलेले आहे. रामायण काळातील यशोगाथा पाहिल्यास अशीच एक घटना प्रसिद्ध आहे. पराक्रमी आणि विद्वान लंकापती रावणाने  (Ravan) त्याच्या मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला (Laksham) काही कान मंत्र दिले होते.

 

पहिला कानमंत्र

रावणाने लक्ष्मणाला पहिली गोष्ट सांगितली की शुभ कार्य लवकरात लवकर करावे. त्यासाठी कधीही जास्त वेळ थांबू नये. कारण आयुष्य कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही.

दुसरा कानमंत्र

रावणाने लक्ष्मणाला दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली की शत्रू आणि रोग कधीही लहान मानू नये. अगदी छोटासा आजारही जीवघेणा ठरू शकतो. अगदी लहान शत्रूही धोकादायक ठरू शकतो. रावणाने राम, लक्ष्मण आणि त्यांच्या वानरसेनेचा तिरस्कार केला होता आणि तेच रावणाच्या मृत्यूचे कारण बनले.

 तिसरा कानमंत्र

रावणाने लक्ष्मणाला तिसऱ्या रहस्याबद्दल सांगितले की, माणसाने स्वतःच्या  जीवनाशी संबंधित रहस्य शक्य तितके गुप्त ठेवले पाहिजे. त्याने कोणालाही ते सांगू नये. जरी तो तुमचा सर्वात प्रिय असला तरीही. जर ते रहस्य कोणाच्या समोर आले तर त्याचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. रावणाच्या नाभीतील अमृतकुंडाचे रहस्य विभीषणाला माहीत होते आणि तेच रावणाच्या पराभवाचे कारण बनले.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)