AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

zodiac | पुतीन आणि पुष्पाची रास एकच!, काहीही झालं तर झूकेंगा नहीं साला, जाणून घ्या राजकारणातील धुरंधराची रास

युद्धात आक्रमक असणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची रास तुम्हाला माहित आहे का?  व्लादिमीर पुतीन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 झाला आहे.

zodiac | पुतीन आणि पुष्पाची रास एकच!, काहीही झालं तर झूकेंगा नहीं साला, जाणून घ्या राजकारणातील धुरंधराची रास
putin zodiac
| Updated on: Feb 27, 2022 | 9:37 AM
Share

मुंबईराशी (Rashi )व्यक्तीबद्दल खूप काही सांगून जातात. गेल्या काही दिवसांपासून जागतीक राजकारणात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) तणाव वाढला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये वाद नवा नाही. परंतु सध्या तो इतका टोकाला गेलाय की, ही दोन्ही राष्ट्रे युद्धाच्या (War) उंबरठ्यावर उभी आहेत. पण युद्धात आक्रमक असणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची रास तुम्हाला माहित आहे का?  व्लादिमीर पुतीन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 झाला आहे. ज्या लोकांचा वाढदिवस 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या महिन्यात झालेला असतो त्यांची रास तूळ (Libra)मानली जाते. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. सतत द्विधा मनस्थितीत असल्याने समोरच्या व्यक्तीला मात्र तूळ राशीच्या व्यक्ती धूर्त वाटतात. या व्यक्तींना कोणीही हक्क गाजवलेला आवडत नाही आणि ना या व्यक्ती कोणावर हक्क गाजवत. या व्यक्ती आपल्या समजूतदारपणासाठी ओळखल्या जातात. स्वतःला काहीही येत नसेल तरीही कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या मागे चालणं अथवा त्यांना फॉलो करणं या व्यक्तींना अजिबात जमत नाही. चला तर जाणून घेऊयात कसे असतात या राशींचे लोक.

  1. तूळ राशीच्या व्यक्ती या अत्यंत संवेदनशील असतात. या व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी सहसा कोणाहीबरोबर वाटून घेत नाहीत. मनातील गोष्टी बोलताना खूप विचार करतात. त्यामुळे यांच्याविषयी जाणून घेणे कठीण आहे.
  2. करिअरबाबत सांगायचे झाले तर या व्यक्ती कुशल राजकारणी असतात. याशिवाय कलाकार, उद्योगपती, डॉक्टर बनण्याची धमक यांच्यामध्ये असते. तसं तर या व्यक्ती राजकारणामध्ये अधिक माहीर असतात. कोणत्याही गोष्टीच्या तळाशी जाऊन या व्यक्ती विचार करतात.
  3. या व्यक्ती सुंदरतेला अधिक प्राधान्य देतात. ज्यामुळे यांचा दृष्टीकोन चुकीचा आहे असा गैरसमज यांच्याबाबतीत होऊ शकतो. या व्यक्ती दिसायला नॉर्मल असतील तरीही स्वतःला कोणत्याही राजकुमार अथवा राजकुमारीपेक्षा कमी समजत नाहीत.
  4. या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट लागते. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना कोणती गोष्ट आवडणे कठीणच.
  5. या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे रागावर आणि नको त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे या व्यक्तींना खूपच चांगले जमते. या व्यक्तींचे मिथुन, कर्क आणि कुंभ या मित्र राशी असून धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींशी यांचे अजिबात पटत नाही.
  6. तूळ राशीच्या व्यक्तींची नजर अत्यंत पारखी असते. वस्तू पाहूनच ती किती किमतीची असेल याची कल्पना या व्यक्ती करू शकतात. कोणाहीबाबत पटकन मत या व्यक्ती करून घेत नाही. पहिले त्या व्यक्तीचे नीट निरीक्षण करून मगच आपले मत बनवतात.

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते, ‘या’ 5 गोष्टी समजून घेतल्या तर, सर्वात मोठे संकट ही आल्या पावली निघून जाईल

सर्व अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील, केशराचे हे उपाय नक्की करुन पाहा

महादेवाच्या पंचाक्षर स्तोत्राने अशक्य गोष्टी शक्य होतील, महाशिवरात्रीला ‘हा’ पाठ नक्की वाचा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.