AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan 2022: श्रावणाचा दुसरा सोमवार या तीन राशींसाठी असणार फलदायी, महादेवाची होणार कृपा

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. अशा स्थितीत एकादशी आणि सोमवारच्या व्रतामुळे या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी रवि योगही तयार होत आहे.

Shravan 2022: श्रावणाचा दुसरा सोमवार या तीन राशींसाठी असणार फलदायी, महादेवाची होणार कृपा
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 06, 2022 | 6:29 PM
Share

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रावण महिना खूप विशेष आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. 8 ऑगस्ट रोजी श्रावणाचा  दुसरा सोमवार (Shravan Somwar) आहे. या दिवशी पुत्रदा एकादशीचा योग येत आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. अशा स्थितीत एकादशी आणि सोमवारच्या व्रतामुळे या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी रवि योगही तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) रवि योग शुभ कार्यासाठी खूप चांगला मानला जातो. 08 ऑगस्ट रोजी सकाळी 05:46 ते दुपारी 02:37 पर्यंत रवि योग असेल. ज्योतिषांच्या मते, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भगवान शंकराची काही राशींवर विशेष कृपा असेल. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.

  1. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावणाचा दुसरा सोमवार खूप खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा राहील. या राशीच्या लोकांना दुसऱ्या  सोमवारी त्यांच्या सर्व कामात यश मिळेल. एवढेच नाही तर आरोग्याच्या समस्याही संपतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भगवान शंकराची पूजा करणे लाभदायक ठरेल.
  2. मिथुन- श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. शिवाच्या कृपेने तुमची सर्व बिघडलेली कामे होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. चिंता दूर होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना फायदा होईल.
  3. तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी श्रावणाचा दुसरा सोमवार शुभ फळ देईल. श्रावणाचा दुसऱ्या सोमवारीही भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहील. नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आधीच नोकरीत असाल तर बढतीची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आत्मविश्वास वाढेल. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शंकराला जल अर्पण करणे शुभ ठरेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान