AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रहण संपलं पण पुढचे 15 दिवस प्रभाव राहणार कायम! या चार राशींनी जरा सांभाळूनच

राखी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण झालं. पण भारतातून हे ग्रहण दिसणार नव्हतं म्हणून वैदिक नियम पाळण्याची गरज नव्हती. असं असलं तरी या चंद्रग्रहणाचा प्रभाव मात्र राशीचक्रावर होणार असल्याचं ज्योतिष्यांचं म्हणणं आहे. चंद्रग्रहणाचा कालावधी लोटला असला तरी 15 दिवस याचा प्रभाव असेल.

ग्रहण संपलं पण पुढचे 15 दिवस प्रभाव राहणार कायम! या चार राशींनी जरा सांभाळूनच
| Updated on: Aug 28, 2026 | 8:01 PM
Share

वर्ष 2026 मधील शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑगस्ट 2026 रोजी पार पडलं. हे खंडग्रास चंद्रग्रहण होतं आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 6.55 ते दुपारी 12.30 पर्यंत होतं. त्यामुळे हे ग्रहण काही भारतातून दिसलं नाही. रात्र असलेल्या अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील काही देशांमध्ये दिसलं. ज्योतिषशास्त्रानुसार, वैदिक नियम पाळण्याची गरज नव्हती. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण कुंभ आणि शतभिषा नक्षत्रात लागलं आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसलं नसलं तरी त्याचा राशीचक्रावर मात्र प्रभाव पडेल, असं ज्योतिष तज्ज्ञ सांगत आहेत. ज्योतिष मान्यतेनुसार पुढेच 15 दिवस म्हणजेच अमावास्येपर्यंत या ग्रहणाचा प्रभाव राशीचक्रावर जाणवणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणारआहे.

कर्क: या राशींचा स्वामी ग्रह हा चंद्र आहे. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतरही पुढचे 15 दिवस मानसिक ताण, अनिद्रा, मनात अचानक भीती वाटणे असे प्रकार घडतील. त्यामुळे या कालावधीत काळजी घेणं गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या जातकांनी तडकाफडकी निर्णय घेऊ नये. इतकंच मोठी गुंतवणूक करणं टाळावं. या कालावधीत जास्तीत जास्त नामस्मरण करावं. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल.

सिंह : या जातकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. भागीदारीचा व्यवसाय करत असाल तर मतभेद होऊ शकतात. इतकंच काय तर अनावश्यक खर्च वाढू शकतो. पटकन कोणावरही विश्वास ठेवून व्यवहार करू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. या राशीच्या जातकांनी दररोज सूर्याला अर्घ्य देऊन आदित्य हृदय स्तोत्राचा पठण करावं.

वृश्चिक: कामाच्या ठिकाणी अचानक ताण वाढू शकतो. वरिष्ठांकडून त्रास दिला जाईल. त्यामुळे मानसिक खच्चीकरण होईल. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना काळजी घ्या. आरोग्याची योग्य काळजी घ्या. मंगळवारी हनुमान चालीसेचं पठण करा. गायीची सेवा करा.

कुंभ : या राशीच्या जातकांना पुढच्या 15 दिवसात बऱ्याच घडामोडी घडताना दिसतील. आरोग्याच्या बाबतीत चढ उतार दिसतील. आत्मविश्वास खालावेल आणि काही कामं अर्धवट राहण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कामं टाळू नका, ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप