Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य 22 ते 28 मे 2023, या राशीच्या लोकांच्या मान सन्मानात होणार वाढ

साप्ताहिक राशी भविष्य. जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा जाणार हा आठवडा

Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य 22 ते 28 मे 2023, या राशीच्या लोकांच्या मान सन्मानात होणार वाढ
साप्ताहिक राशी भविष्य
Image Credit source: Social Media
| Updated on: May 21, 2023 | 6:32 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, (Weekly rashi bhavishya Marathi) महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य

मेष

प्रत्येक दिवस हा चांगला जाणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज वाटणार नाही. या सप्ताहात अपेक्षेपेक्षासुद्धा जास्त प्रगती होईल. गुरुपुष्यामृत योग स्वप्नवत गोष्टी पूर्ण करणारा आहे. व्यवसायात इतरांनी मार्गदर्शन करावे, ही अपेक्षा मनात न ठेवता काम केलेले चांगले राहील. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी वेळीच सुधारल्या तर कामाला वेळ लागणार नाही. आर्थिक नियोजन चांगले असेल. राजकीय क्षेत्रात कामात व्यस्त राहाल. भावंडांच्या संदर्भात घेतलेले निर्णय योग्य असतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल. मानसिक ताणतणाव कमी होईल. आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. प्रकृतीत सुधारणा होईल.

वृषभ

ज्या वेळी परिस्थिती हाताबाहेर असते त्या वेळी नको तेवढा प्रयत्न करता व ती कामे यशस्वी झाली नाही की नाराजही होता. पण सध्याची परिस्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांगल्या कालावधीत नेहमी सकारात्मकता वाढत असते हे विसरू नका. तेव्हा ही सुवर्णसंधी आहे असे समजा. गुरुपुष्यामृत योग तुमच्या चतुर्थस्थानातून होत आहे हा योग नक्कीच तुमच्या बचतीत वाढ करेल. व्यावसायिकदृष्टय़ा तुम्ही स्वत:हूनच बदल करून कामाचा व्याप वाढवणार आहात. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे लागेल. आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे कराल. ओळखीचा जेवढय़ास तेवढा वापर करा. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन

सप्ताहात शुभ ग्रहांची साथ चांगली आहे असेच म्हणावे लागेल. ज्या गोष्टींना बरेच दिवस उशीर लागत होता त्या गोष्टी वेळेत होतील. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ घेता येईल. चांगल्या कालावधीमध्ये इतरांकडून मार्गदर्शनही चांगलेच मिळेल. स्वत:च्या हिमतीवर कामात यश मिळेल. गुरुपुष्यामृत योग धनस्थानातून होत आहे. धनस्थान मजबूत होईल. व्यावसायिक उलाढाल वाढलेली असेल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला कामांमध्ये ज्या गोष्टींविषयी शंकाकुशंका वाटत होत्या त्या शंकांचे निरसन होईल. आर्थिकदृष्टय़ा मजबुती येईल. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गोष्टींची आवड निर्माण होईल. भावंडांना वेळीच समज द्या. नातेवाईकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हाल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रकृती चांगली असेल.

कर्क

कोणाच्या सांगण्या- बोलण्याचा फारसा विचार करू नका. त्यामुळे इतरांपेक्षा तुम्हालाच त्रास होऊ शकतो. स्पष्ट गोष्टी बोलल्यामुळे नात्यात अंतर येऊ शकते. शांत राहूनच काम करणे योग्य राहील. प्रत्येक गोष्टीत घाई करून चालणार नाही. सध्या कोणाचे मत काय, या विषयावर चर्चा करू नका. स्वत:चे काम स्वत:च करा. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य ठिकाणी वापर करा. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. खर्च आटोक्यात ठेवा. समाजसेवेत गुंतून राहाल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.

सिंह

चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागणार आहे हे माहीतच आहे. त्यामुळे त्यासाठी धावपळ करायची नाही. जे जमणार आहे अशाच गोष्टींसाठी वेळ घालवलेला चांगला राहील. धीर धरूनच प्रत्येक गोष्ट करावी लागेल. गुरुपुष्यामृत योग तुमच्या व्ययस्थानातून होत आहे. या दिवशी फार मोठी खरेदी करू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्टय़ा जी सुरळीत घडी चाललेली आहे त्यात बदल होतील. त्यासाठी तुम्हालाच पर्यायी मार्ग शोधावे लागतील. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. धार्मिक गोष्टीत सहभाग नसला तरी खर्च कराल. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा.

कन्या

ऐन वेळी धावपळ झाल्याने चिडचिड वाढेल. असे होऊ नये यासाठी आळस करून चालणार नाही. प्रत्येक गोष्ट नियोजनाने करा. वेळेचे बंधन पाळा. त्यामुळे त्रास वाढणार नाही. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळाढवळ करू नका. स्वत:साठी वेळ द्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. गुरुपुष्यामृत योग लाभस्थानातून होत आहे. या दिवशी नक्कीच गुंतवणुकीचा विचार करा. व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार त्याचा योग्य ठिकाणी वापर करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक बाबतीत चढउतार राहील. हातून पुण्यकर्म घडेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मानसिक दडपण घेऊ नका. योगसाधनेला महत्त्व द्या.

तूळ

मग चांगल्या गोष्टींसाठी उशीर कशाला? आपली बाजू इतरांनी ऐकून घेण्याची ही वेळ आहे. अशा वेळेलाच महत्त्व देऊन आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करा. सर्वच बाजूंनी समाधानाची बाब राहील. स्थावर मालमत्तेबाबत चर्चा करायची असल्यास ते गुरुपुष्यामृत योगावर करा. व्यावसायिकदृष्टय़ा लाभदायक दिवस असतील. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत आघाडी मिळवाल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक

दडपण घेऊ नका. त्यामुळे त्रास होणार नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून इतरांनी बदल करावा, ही अपेक्षा सोडून द्या. त्यासाठी स्वत:तच बदल करा. सध्या वेळ चांगली नसताना कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. या गोष्टी उलट तुमच्याच अंगलट येऊ शकतात. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. गुरुपुष्यामृत योगादिवशी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. व्यवसायात व्यवहाराच्या बाबतीत कोणाची मध्यस्थी करायला जाऊ नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घातलेले चांगले राहील. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. नातेवाईकांशी संवाद साधाल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आरोग्याची काळजी घ्या.

धनु

ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले चांगले राहील. गुरुपुष्यामृत योग अष्टमस्थानातून होत आहे. या दिवशी महत्त्वाचे करार करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पटकन करून घ्या. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाच्या कामकाजात झालेले बदल स्वीकारावे लागतील. आर्थिक बाबतीत योग्य असे नियोजन करा. राजकीय क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता राहणार नाही. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. शारीरिकदृष्टय़ा विश्रांतीला महत्त्व द्या.

मकर

सप्ताहातील  सर्वच दिवस जपून पाऊल टाकावे लागेल. ‘आपले काम भले नि आपण भले’ हेच लक्षात ठेवा. गुरुपुष्यामृत योग दिवस चांगला जाईल. व्यावसायिकदृष्टय़ा भागीदारीसाठी काही प्रस्ताव आला तर तो स्वीकारू नका. स्वतंत्र व्यवसायालाच महत्त्व द्या. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले. आर्थिक बाबतीत व्यवस्थापन नीट करा. त्यामुळे आर्थिक अडचण जाणवणार नाही. समाजमाध्यमांचा वापर सध्या करूच नका. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. प्रकृतीबाबतीत हलगर्जीपणा टाळा.

कुंभ

गुरुपुष्यामृत योग षष्ठस्थानातून होत आहे. त्यामुळे या दिवशी ओढूनताणून कोणतीही गोष्ट करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात काही अडचणी आल्या तरी त्या निवळण्यासारख्या आहेत. त्यावर पर्यायी मार्ग लगेच मिळेल. नोकरदार वर्गाने कामाच्या बाबतीत दुहेरी भूमिका टाळा. खर्च कमी करा. सार्वजनिक ठिकाणी सहभागी होताना भान ठेवा. संततीविषयक गोड बातमी कळेल. घरगुती वातावरण ठीक राहील. उपासना फलद्रूप होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

मीन

मान सन्मानात वाढ होईल. व्यवसायात आवक उत्तम राहील.  नोकरदार वर्गाला तांत्रिक अडचणीमुळे जे अडथळे येत होते ते कमी होतील. आर्थिकदृष्टय़ा उधारी टाळा. राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. मुलांचे हट्ट पूर्ण कराल. घरगुती वातावरण ठीक राहील. मानसिकदृष्टय़ा समतोलत राखा. आरोग्याची काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)