कुंडलीत ‘हा’ एक योग आला की सुख पायाशी लोळण घेईल, पैशांचीही होईल बरसात!

राजयोग हा फार महत्त्वाचा असतो. तो कुंडलीत आला तर तुम्ही सुख-समृद्धीत नांदाल असे मानलेज जाते. राजयोग अनेक प्रकारचे असतात.

कुंडलीत हा एक योग आला की सुख पायाशी लोळण घेईल, पैशांचीही होईल बरसात!
what is rajyog
| Updated on: May 22, 2025 | 9:38 PM

What is Rajyog : कुंडलीत अनेक योग शुभ मानले जातात. यातील सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे राजयोग. तुमच्या कुंडलीत राजगोय आल्यावर तुमची सर्व संकटं नष्ट होतात, असे मानले जाते. विशेष म्हणजे तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येईल असे मानले जाते. हा योग एकदा का आला की तुमचे जीवन एखाद्या राजाप्रमाणेच सुखविलासात व्यतीत होते, असेही म्हटले जाते. कुंडलीत अनेक प्रकारचे राजगोय असता. कुंडलीत जेवढे जास्त राजयोग तेवढेच जीवन समृद्ध असे मानले जाते.

राजयोग कसा बनतो?

कुंडलीत जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह स्वराशी तसेच उच्च राशीत असतो तेव्हा राजयोग बनतो. राजयोग येण्यासाठी शुभ्र हगांचा संयोग तसेच कुंडलीत त्या गृहांची स्थिती काय आहे, हे फार महत्त्वाचे ठरते. चंद्र जेव्हा केंद्रस्थानी असतो आणि त्यावर गुरूची दृष्टी पडते तेव्हा राजयोग येतो. अशाच प्रकार अन्य ग्रहांच्या काही स्थितीमुळेही राजयोग येतो.

राजयोगाचे अनेक प्रकार असतात. अनेक राजयोगांमध्ये महाभाग्य राजयोग सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कुंडलीत हा योग आला की संबंधित व्यक्तीला नशीब पूर्णपणे साथ देतं असं मानलं जातं. या राजयोगाव्यतिरिक्त गजकेसरी योग, अमला योग, पंच महापुरुष योग हेदेखील काही राजयोग आहेत.

राजयोगाचा सकारात्मक प्रभाव

कुंडलीत राजयोग तयार होत असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. ज्याच्या कुंडलीत राजयोग येईल त्याला धन-संपत्ती कधीच कमी पडत नाही. ज्याच्या कुंडलीत राजयोग येतो त्याच्यात नेतृत्त्वगुण असतो तसेच त्याचे ज्ञानही उच्च दर्जाचे असते. राजयोग असणारे काही अध्यात्मिक स्वरुपाचे असतात. कुंडलीत राजयोगाचा प्रभाव जेवढा जास्त तेवढा संबंधित व्यक्ती भाग्यशाली तसेच आर्थिक दृष्टीकोनातून समृद्ध होतो.

राजयोगाचा काही नकारात्मक प्रभावदेखील असतो. कुंडलीतील गृहांची स्थिती लक्षात घेऊन तुमच्यावर राजयोगाचा सकारात्मक प्रभाव पडेल की नकारात्मक हे समजून येते. शुभ ग्रहांची अशुभ ग्रहांशी युती झाली तर राजयोगाचा प्रभाव कमी होऊ शकतो.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)