Special Story : मराठीतील एकमेव ओटीटी माध्यम लवकरच आपल्या भेटीला, ‘प्लॅनेट मराठी’ सर्वत्र चर्चा

मराठी सिनेमे, मराठी तरुणांमधली गुणवत्ता, मराठी कलाकाराचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'प्लॅनेट मराठी'. (The only OTT medium in Marathi is coming soon, 'Planet Marathi' is in the trend )

Special Story : मराठीतील एकमेव ओटीटी माध्यम लवकरच आपल्या भेटीला, 'प्लॅनेट मराठी' सर्वत्र चर्चा
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 9:38 AM

मुंबई : गेले अनेक दिवस सोशल मीडिया बातम्या आणि कलाकारांच्या पोस्टमध्ये ‘प्लॅनेट मराठी’ या प्लॅटफॉर्म बद्दल बोललं जातंय. तर सुरुवातीला या प्लॅटफॉर्मचं नक्की उद्देश तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला. तर मराठी सिनेमे, मराठी तरुणांमधली गुणवत्ता, मराठी कलाकाराचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे ‘प्लॅनेट मराठी’ आणि गेले अनेक दिवस हे प्लॅटपॉर्म चर्चेत आहे. थोड्या काळात यशाचं शिखर गाठणाऱ्या या प्लॅटफॉर्मचा चेहरा आहे अक्षय बर्दापूरकर हा मराठी तरुण. येत्या काळात प्लॅनेट मराठीच्या काही वेबसीरिज आणि नवीन संहिता असलेले काही नवे शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आहेत असं म्हटलं जातं. मराठी सिनेमांचे विषय, कथानकांतलं वेगळेपण, सादरीकरणाची पद्धत या सगळ्याच बाबतीत कमालीचा बदल झाल्याचं पाहायला मिळतं. मराठी सिनेमा जाहिरातीत कुठल्याही प्रकारे मागे पडू नये या हेतूनं ‘प्लॅनेट मराठी’ या युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली. अक्षय बर्दापूरकर हा मराठी तरुण त्यासाठी काम करतोय. विशेष म्हणजे ‘ट्विटर इंडिया’सोबत असोसिएशन असलेलं हे एकमेव आणि पहिलं मराठी वेबचॅनेल आहे. भाषिक ओटीटीमाध्यमांच्या लाटेत आगामी ‘प्लॅनेट मराठी’ची चर्चा सुरू आहे. मराठीतील पाहिलंवहिलं आणि एकमेव ओटीटी माध्यम लवकरच आपल्या भेटीला येणारे.

अक्षय बर्दापूरकरनं हे प्लॅटफॉर्म सुरू केलं खरं पण आता ही टीम प्रचंड मोठी होत चालली आहे. नुकतंच महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक मॅन’प्लॅनेट टॅलेंट’मध्ये सामील झाला आहे. सोबतच अभिनेत्री अमृता खानविलकर, गायत्री दातार, सायली संजीव, शिवानी बावकर, अभिनेता निखिल चव्हाण, दिग्दर्शक-सिनेमाटोग्राफर संजय जाधव या भारी लोकांची प्लॅनेट मराठीमध्ये दमदार एन्ट्री होणार आहे.

एवढंच नाही मराठीतील एकमेव ओटीटी माध्यम लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपट, नाटक आणि कलाकारांचे चांगले दिवस येतील हे नक्कीये.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....