AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्माष्टमीला जुळून येईल मोठा योग, ‘या’ 4 राशींचं भाग्य चंद्रासारखं चमकेल, कोणती आहे तुमची रास?

हिंदू धर्मात जन्माष्टमीला मोठं महत्त्व आहे. या दिवशी मोठा योग जुळून येणार आहे. ज्याचा फायदा 12 राशींपैकी चार राशींना होणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी जाणून घ्या...

जन्माष्टमीला जुळून येईल मोठा योग, 'या' 4 राशींचं भाग्य चंद्रासारखं चमकेल, कोणती आहे तुमची रास?
Janmashtami
| Updated on: Sep 02, 2026 | 9:57 AM
Share

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यांदाच्या वर्षी 4 सप्टेंबर 2026 रोजी देशात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अशात चार राशींसाठी यंदाची जन्माष्टमी खास ठरणार आहे. कारण या जन्माष्टमीला द्वापर युगासारख्या ऐतिहासिक आणि दुर्मिळ ज्योतिषीय संयोगांसह कृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण साजरा केला जाईल. या दिवशी चंद्र वृषभ राशीत उच्च राशीत असेल आणि रोहिणी नक्षत्राच्या उपस्थितीत ‘सर्वार्थ सिद्धी योग’ आणि ‘हर्षण योग’ यांची एक अत्यंत शुभ महासंधी देखील तयार होत आहे. याचा फायदा चार राशींना होणार आहे.

वृषभ: जन्माष्टमीच्या दिवशी चंद्र तुमच्या राशीत उच्चस्थानी असेल. रोहिणी नक्षत्रासह ही गोष्ट तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल. बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना अचानक गती मिळेल. आर्थिक लाभाची दाट शक्यता निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक होऊ शकते आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

सिंह: राशीसाठी देखील कृष्ण जन्म खास ठरणार आहे. सर्वार्थ सिद्धी आणि हर्षण योगाच्या निर्मितीमुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा आपला व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होण्याचे प्रबळ संकेत आहेत.

वृश्चिक: येत असलेल्या योगामुळे वैवाहिक आणि भागीदारीच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक सलोख्याचे होईल आणि तुम्हाला त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नवीन व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतात. यामुळे भविष्यात महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.

मकर: रोहिणी नक्षत्र आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा हा संयोग मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जाईल. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. घरात आनंदाचं वातावरण राहील. उत्पन्नाचं नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरीत्या मजबूत होईल.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,