AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction 2026: जूनमध्ये या राशींना लॉटरी! बाबा वेंगाचं काय भाकीत? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभच लाभ

baba vanga weekly prediction: जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बाबा वेंगाने या राशींना लॉटरी लागण्याचे भाकीत केले आहे. या पाच राशींसाठी वेळ अत्यंत अनुकूल आहे. या राशीच्या लोकांना करिअर, आर्थिक क्षेत्र आणि कौटुंबिक जीवनात एकदम सुखद अनुभव येईल.

Baba Vanga Prediction 2026: जूनमध्ये या राशींना लॉटरी! बाबा वेंगाचं काय भाकीत? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभच लाभ
बाबा वेंगा भाकीतImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 31, 2026 | 3:22 PM
Share

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: जगभरात आपल्या रहस्यमयी भविष्यासाठी बाबा वेंगा चर्चेत आहेत. आता जून 2026 चा पहिला आठवडा सुरू होत आहे. 1 ते 7 जून या कालावधीत बाबा वेंगाची राशीनुसार भाकीतं चर्चेत आली आहेत. या आठवड्यात या राशींना आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्य क्षेत्रात मोठा लाभ मिळणार आहे. या कालावधीत या राशींना लॉटरी लागणार आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी?

वृषभ राशीसाठी बाबा वेंगाचे काय भाकीत

बाबा वेंगानुसार, वृषभ राशीसाठी 1 ते 7 जून हा कालावधी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित कामे मार्गी लागतील. त्यामुळे कामं झटपट पूर्ण होतील. धावपळीतून मुक्ती मिळेल. नोकरदार वर्गाला जूनच्या पहिल्या आठवड्यात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. सासरकडील ताणतणाव अचानक संपेल, त्यामुळे हायसे वाटेल. करिअरमध्ये नवीन संधी दार ठोठावणार.

कन्या राशींचे घराचे स्वप्न पूर्ण

बाबा वेंगानुसार, कन्या राशीची या आठवड्यात करिअर आणि शिक्षणात चांगली प्रगती होईल. फ्लॅट अथवा घर खरेदीचे अनेक दिवसांचे स्वप्न या आठवड्यात पूर्ण होईल. या आठवड्यात घरासंबंधी चांगली वार्ता येऊन धडकेल. जुन्या आर्थिक गुंतवणूकीतून आता मोठा फायदा मिळेल. जुन्या मित्राची अचानक भेट होईल. अथवा फोनवर चर्चा होईल. नोकरीत बढती मिळेल. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी झाल्याने आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासह चांगला वेळ जाईल.

धनु राशीच्या लोकांसाठी कसा असेल काळ?

1 ते 7 जून हा आठवडा धनु राशीसाठी खास असेल. अनेक दिवसापासून प्रलंबित कायदेशीर अडचणी दूर होतील. पती-पत्नीतील वाद, भांडणं संपतील. भाग्याची मोठी साथ मिळेल. कुटुंबासह धार्मिक यात्रेचा योग आहे. अनेक दिवसांपासून नोकरी शोधत असाल तर या आठवड्यात आनंदवार्ता आलीच म्हणून समजा. व्यवसाय, व्यापाराता प्रगती होईल. अनेक जुनी कामे मार्गी लागतील. कोणीतरी दूरचा नातेवाईक आनंदवार्ता देईल.

मकर राशीसाठी कसा असेल नवीन आठवडा

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा एकदम चांगला असेल. त्यांचे भाग्य उजळेल. नोकरदारांना नवीन जबाबदारी मिळेल. त्यांच्या बढतीचे आणि पगारवाढीचे योग आहे. कौटुंबिक सहल होईल. सुखशांती मिळेल. आरोग्याच्या कुरबुरी दूर होतील. मानसिकदृष्ट्या मोठे समाधान, दिलासा मिळेल. अचानक चांगली वार्ता येऊन धडकेल.

मीन राशीची पाचही बोटं तुपात

1 ते 7 जून हा आठवडा मीन राशीसाठी जून मृगाचा पाऊस असेल. एकामागून एक आनंदवार्ता धडकतील. आकाश ठेंगणं होईल. सामाजिक मान सन्मान मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. प्रेमात नवीन आनंदवार्ता ऐकायला तयार रावा. वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. खऱ्या अर्थाने पाचही बोटं तुपात असल्याचा भास होईल.

(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून.
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक.
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....