AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरी भगवान कृष्णाची आवडती बासरी ठेवताय? जाणून घ्या होणारे फायदे…

भगवान श्रीकृष्ण यांना बासरीची खूप आवड असल्याने, वास्तुशास्त्रानेही घरात बासरी ठेवण्याला विशेष महत्त्व दिलं आहे. मान्यतेनुसार, घरात योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी बासरी ठेवल्याने अनेक फायदे मिळतात.

घरी भगवान कृष्णाची आवडती बासरी ठेवताय? जाणून घ्या होणारे फायदे...
| Updated on: Sep 04, 2026 | 10:15 AM
Share

दरवर्षी भारतातील मंदिरे आणि धार्मिक संस्थांमध्ये श्रीकृष्ण (Shri Krishna) जन्माष्टमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या उत्सवासाठी लोक मोठ्या संख्येने जमतात आणि हा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. कृष्ण याची भक्ती करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, अनेक जण भगवान श्रीकृष्ण यांची आवडती बासरी देखील अनेकांच्या घरी असते. तर घरात बासरी ठेवल्याने कोणते सकारात्मक बदल होतात जाणून घ्या. सांगायचं झालं तर, भगवान श्रीकृष्ण यांना बासरीची खूप आवड असल्याने, वास्तुशास्त्रानेही घरात बासरी ठेवण्याला विशेष महत्त्व दिलं आहे. मान्यतेनुसार, घरात योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी बासरी ठेवल्याने अनेक फायदे मिळतात. तर जाणून घेऊया, घरात बासरी ठेवण्याचे फायदे काय आहेत आणि ती कशी ठेवली पाहिजे.

वास्तुशास्त्रानेही घरात बासरी ठेवण्याला विशेष महत्त्व दिलं आहे. मान्यतेनुसार, घरात योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी बासरी ठेवल्याने अनेक फायदे मिळतात. भगवान कृष्णाचे निवासस्थान मानलं जातं. वास्तूनुसार, ज्या घरात बासरी असते ते घर भगवान कृष्णाचं निवासस्थान बनतं. त्यांच्या कृपेने घरात शांती आणि आनंद नांदतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद: घरात बासरी ठेवल्याने धन आणि समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही. देवी लक्ष्मी अशा घरांना समृद्धीचा आशीर्वाद देते.

भगवान कुबेराशी संबंध: वास्तुशास्त्रानुसार बासरीचा संबंध संपत्तीचे देवता असलेल्या भगवान कुबेराशी जोडला जातो. बासरीचा नाद मन आणि बुद्धीला शांत करतो; शिवाय, हे वाद्य कला आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे.

कामाच्या ठिकाणी बासरी ठेवण्याचे अनेक फायदे होतात. घरातील देवघरात बासरी ठेवणं शुभ मानलं जातं. याशिवाय, ज्या लोकांना व्यवसायात सतत तोटा होत आहे किंवा निधीची कमतरता भासत आहे, त्यांना कामाच्या ठिकाणी बासरी ठेवल्याने फायदा होऊ शकतो.

तुम्ही कोणत्या प्रकारची बासरी ठेवावी? : प्लास्टिक किंवा इतर धातूंच्या बासरीऐवजी लाकडी बासरी वापरण्याचा सल्ला दिला जाते. जर तुम्हाला धातूची बासरी ठेवायची असेल, तर सोन्याची किंवा चांदीची बासरी निवडा.

(डिस्क्लेमर : या बातमीतील माहिती चाणक्य नीतीतील विचार आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक किंवा तथ्यात्मक प्रमाण मानू नये.)

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी