AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips for Money : पगार येतो पण पैसा टिकत नाही ? घरातील या 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष !

महिन्याच्या सुरूवातील चांगली कमाई होऊनही काहीच दिवसांत हातातले पैसे संपतात आणि बचतीसाठी काहीच उरत नाही ? मग खर्चाच्या सवयी तर तपासाच पण...

Vastu Tips for Money : पगार येतो पण पैसा टिकत नाही ?  घरातील या 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष !
vastu tips for savings and wealth
| Updated on: Aug 31, 2026 | 5:06 PM
Share

बऱ्याच लोकांसोबत असं होतं की महिन्याच्या सुरूवातील पगार येतो किंवा चांगली कमाई तर होते. तेव्हा असं वाटत की यावेळी खूप बचत करू, पण हळूहळू एकेक खर्च डोकं वर काढायला लागतात आणि महीना अखेरीस हातात फार काही उरत नाही. अशा परिस्थितीत सर्वात पहिले तुमचा खर्च कुठे कुठे होतो याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. मात्र त्यानंतर वास्तुशास्त्रातील काही मान्यतांकडेही पाहिले जातं. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार घराची दिशा, स्वच्छता आणि काही वस्तू ठेवण्याची पद्धत यांचा संबंध धन आणि सकारात्मकतेशी जोडला जातो. असे मानले जाते की घरात सतत अव्यवस्था असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, ज्याचा परिणाम जीवनातील इतर गोष्टींसोबत आर्थिक संतुलनावरही होऊ शकतो.

घरचा ईशान्य कोपरा ठेवा स्वच्छ

वास्तु शास्त्रात घराच्या उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्याला विशेष महत्व आहे. असं म्हटलं जातं की ही दिशा स्वच्छ, मोकळी आणि व्यवस्थित ठेवावी. तिथे अनावश्यक वस्तू, तुटक्या गोष्टी किंवा घाण जमा होऊ देऊ नये. वास्तु शास्त्रानुसार, ईशान्य कोपऱ्यात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण राखलं तर घरात सुख-समृद्धीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे वेळोवेळी या दिशेतील जागेची स्वच्छता करणेणं आवश्यक आहे.

तिजोरी आणि लॉकरची दिशाही महत्वाची

घरात जिथे रोख रक्कम, महत्वाची कागदपत्र आणि दागिने ठेवले जातात, ती जागाही वास्तुशास्त्रात महत्त्वाची मानली जाते. असं म्हणतात की तिजोरी किंवा लॉकर हे दक्षिण-पश्चिम दिशेला असणं अशुभ असतं. त्याचं तोंड हे उत्तर किंवा पूर्वेला असावं. वास्तुनुसार, तिजोरीच्या आसपाससुद्धा घाण किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. धार्मिक मान्यतांमध्ये पैसे किंवा धन ठेवण्याच्या जागेचा आदरपूर्वक वापर करणे हे समृद्धीशी जोडल जातं.

तुटकं -फुटकं सामान जास्त काळ ठेवू नका

अनेक घरांमध्ये तुटकी-फुटकी भांडी, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, बंद पडलेलं घड्याळ किंवा इतर निरुपयोगी वस्तू बराच काळ पडून राहतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार, अशा वस्तू घरात साठवून ठेवणं योग्य मानल जात नाही. खराब किंवा तुटलेल्या वस्तूंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे ज्या वस्तू वापरण्यायोग्य नाहीत, त्या वेळेवर घरातून काढून टाकणंच चांगलं, योग्य मानलं जातं.

स्वयंपाकघरातील स्वच्छता

स्वयंपाकघर ह घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जेवणाशी संबंधित वस्तू आणि अन्न-धान्य इथं ठेवलं जातं. वास्तूशास्त्रानुसार, कोणत्याही घरात स्वयंपाकघर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यावर भर द्यावा. खाण्यापिण्याच्या वस्तू जास्त काळ उघड्या किंवा खराब अवस्थेत ठेवणं देखील टाळावं. स्वयंपाकघरात अनावश्यक घाण आणि निरुपयोगी वस्तू साठवू नयेत.

मुख्य दरवाजापाशी साठू देऊ नका घाण

घराच्या मुख्य दारातूनच आत प्रवेश करता येतो किंवा बाहेर जाणं होतं. वास्तुशास्त्रात याला ऊर्जेच्या प्रवेशाचं स्थान मानलं जातं. त्यामुळेच मुख्य दरवाज्याच्या आसपास स्वच्छता आणि पुरेसा उजेड असावा असा सल्ला दिला जातो. मुख्य प्रवेशदाराजवळ कचरा, घाण किंवा तुटलेलं सामान ठेवू नये, अशी मान्यता आहे. स्वच्छ आणि नीटनेटका प्रवेशद्वार घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास सहाय्यक मानला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा