AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशा 3 गोष्टी ज्या जिवंतपणी व्यक्तीसोबत असतातच परंतु मृत्यूनंतरही पाठ सोडत नाहीत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की अशा काही गोष्टी असतात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्याची पाठ सोडत नाहीत, चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सतत माणसासोबत राहतात.

Chanakya Niti : अशा 3 गोष्टी ज्या जिवंतपणी व्यक्तीसोबत असतातच परंतु मृत्यूनंतरही पाठ सोडत नाहीत
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 7:29 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. या जगात येणारा प्रत्येक माणूस हा कधी न कधी तरी मरणारच आहे. जेव्हा एखादा माणूस मरतो, तेव्हा आपण म्हणतो की तो त्याच्यासोबत कोणतीच गोष्ट घेऊन जात नाही. परंतु अशा काही गोष्टी आहेत, ज्या जिवंतपणी तर माणसाच्या सोबत असताच, परंतु मृत्यूनंतर देखील त्याची पाठ सोडत नाहीत. अशा गोष्टी कायम माणसाच्या सोबत असतात, आणि याच गोष्टींवरून माणसाची खरी ओळख होते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

किर्ती – चाणक्य म्हणतात कोणालाही किर्ती, मान-सन्मान असाच मिळत नाही. त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झिजावं लागतं. आपण लोकांच्या किती मदतीला धावून जातो. आपलं समाजामधील वर्तन कसं आहे. आपली वागणूक कशी आहे. यावर आपला मान-सन्मान आणि किर्ती अवलंबून असते. जेव्हा आपण काही सत्कर्म करतो, तेव्हाच हा समाज आपल्याला मान-सन्मान देतो, आणि हा मान-सन्मान आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्यासोबत कायम राहतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

द्वेष – चाणक्य म्हणतात जशी किर्ती आपल्या सोबत मृत्यूनंतर देखील असते, तशीच आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे द्वेष. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वाईटच कर्म केले असतील, काही चांगलं काम केलं नसेल तर हा समजा तुमचा द्वेष करतो. द्वेष ही अशी गोष्ट आहे, जी तुमच्या मृत्यूनंतरही तुमच्यासोबत येते. जे लोक तुमचा जिवंतपणी द्वेष करतात, तेच लोक तुमचा मृत्यूनंतरही द्वेष करतात. त्यामुळे माणसाने आपले कर्म नेहमी चांगले ठेवावेत.

कर्म – चाणक्य म्हणतात कर्म करणं हे आपल्या हातात असतं, तुम्ही आयुष्यभर जे कर्म केले आहेत, ते तुमच्या मृत्यूनंतर देखील तुमच्यासोबत येतात. तुम्ही तुमच्या कर्मासाठी कायम जगाच्या लक्षात राहतात. त्यामुळे माणसाने चांगले कर्म करावेत असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ