Chanakya Niti : या दोन गोष्टींना जो भीतो तो संपतो, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : या दोन गोष्टींना जो भीतो तो संपतो, चाणक्य काय सांगतात?
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 28, 2025 | 9:08 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि एक आदर्श शिक्षक होते. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, जी नीती सांगितली आहे, ती केवळ राजकारणामध्येच नाही तर माणसाला आपलं आयुष्य जगत असताना आजही मार्गदर्शक ठरते. माणूस आयुष्यात यशस्वी कसा होऊ शकतो? त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.

चाणक्य म्हणतात तुम्हाला यश हे केवळ मेहनत केल्यामुळेच मिळत नाही तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य विचार, धैर्य आणि आत्मविश्वासाची देखील गरज असते. माणसाच्या काही सवयी आणि भीती अशा असतात ज्या त्याला कधीच यशस्वी होऊ देत नाहीत. त्याला कायम यशपासून दूर ठेवतात. त्यामुळे मानसाने अशा सवयींचा वेळीच त्याग केला पाहिजे त्यातच त्याचं भलं आहे,असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य म्हणतात काही लोक एखादं काम केवळ यासाठी करत नाहीत की त्यांना भीती असते लोक काय म्हणतील? त्यामुळे ते कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुमच्यावर झालेल्या टीकेला घाबरणं हा तुमच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे, त्यामुळे तुमच्यावर सुरू असलेल्या टीकेला घाबरू नका, त्यामधून शिका आणि पुढे जा असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे. जे टीकेला न घाबरता पुढे जातात तेच नवे रस्ते निर्माण करू शकतात असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दुसरी गोष्ट चाणक्य यांनी सांगितली ती म्हणजे जीवनामध्ये अडथळे येणं, संकटे येणं ही एक सामान्य बाब आहे, पण अशा संकटापासून तुम्ही दूर पळू नका, त्यामुळे हे संकट आणखी मोठं होईल, तर संकटापासून दूर न जाता त्यावर मार्ग शोधा, यश तुम्हाला नक्की मिळणार असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)