Chanakya Niti : चुकूनही या लोकांना घरातील गोष्टी सांगू नका, अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये माणसं ओळखता आली पाहिजेत. जे लोक आयुष्यात माणसं ओळखायला चुकतात, त्याचं भविष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, तसेच ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी धाननंदासारख्या बलाढ्य राज्याची सत्ता उलथून लावली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात आलेली माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. जर तुम्ही माणसं ओळखायला चुकलात, तर हीच माणसं पुढे जाऊन तुम्हाला मोठा धोका देऊ शकतात. अशावेळी तुमच्या हातात वेळ नसतो. पश्चातापाशिवाय तुमच्याकडे काहीही उरत नाही. त्यामुळे माणसाने आधीच सावध असलं पाहिजे. आपण ज्या व्यक्तीला मित्र बनवणार आहोत, त्या व्यक्तीबद्दल मनाला नेहमी तीन प्रश्न विचारावेत. या व्यक्तीला आपण आपला मित्र का बनवत आहोत? त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो व्यक्ती आपल्याला धोका तर देणार नाही ना? जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक, असतील तर अशा व्यक्तींसोबत तुम्ही मैत्री करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
दुतोंडी मित्र – चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात, जे दुतोंडी असतात. म्हणजे ते तुमच्यासोबतही तेवढंच गोड बोलतात आणि तुमच्या शत्रूसोबतही तेवढंच गोड बोलतात. असे लोक तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. अशा लोकांसमोर कधीही घरातील भेद उघड करू नका, कारण असे लोक ही माहिती तुमच्या शत्रूंना देण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हित आहे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
स्वार्थी लोकं – चाणक्य म्हणतात जे लोकं स्वार्थी असतात, असे लोकं कोणाचेच नसतात, ते फक्त आपला स्वार्थ पाहतात. असे लोक आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांना घरातील कोणत्याही गोष्टी कधीच सांगू नका.
विश्वासघातकी लोकं – चाणक्य म्हणतात ज्या लोकांना विश्वासघात करायची सवय आहे, अशा लोकांपासून सावध राहवं, कारण असे लोक तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
