AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात या जगातील प्रत्येक माणूस प्रसिद्धीसाठी भुकेला असतो. लोकांकडून आपला कायम मान -सन्मान झाला पाहिजे, लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे असं त्याला नेहमी वाटत असतं.

Chanakya Niti : लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा, चाणक्य काय सांगतात?
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 7:21 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. पौराणिक कथांनुसार चाणक्य यांचा राजा धनानंदच्या राज्यात अपमान झाला होता, तेव्हा त्यांनी राजा धनानंदचा पराभव करण्याची शपथ घेतली होती. त्यांनी आपल्या कुटनीतीच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्य यांच्या मदतीने राजा धनानंदाची सत्ता उलथून लावली, धनानंदचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात प्रत्येक व्यक्तीला मान-सन्मान हवा असतो. प्रत्येकाला वाटतं जगाने आपलं कौतुक करावं. म्हणूच जेव्हा एखाद्या ठिकाणी माणसाचा अपमान होतो, तेव्हा माणूस दु:खी होतो. परंतु तेच जेव्हा एखादा व्यक्ती तुमचं कौतुक करतो, तेव्हा तुम्हाला आनंद होतो. कारण कौतुक आणि मान-सन्मान आवडणं हाच मुळ मानवी स्वभाव आहे. परंतु काही गोष्टी अशा असतात, त्या गोष्टी समाजात वावरताना पाळाव्या लागतात, तरच समाज तुमचं कौतुक करतो, तुम्हाला मान-सन्मान देतो, असं चाणक्य म्हणतात, चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यानी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कमी बोला : चाणक्य म्हणतात समाजामध्ये वावरत असताना कमी बोला, जास्तीत जास्त ऐकण्याची सवय करा. जे व्यक्ती जास्त बोलतात, अनेकदा समाज त्यांच्याकडे फार गांभीर्याने पहात नाही. परंतु जे लोक इतराचं जास्तीत जास्त ऐकून घेतात आणि मग आपलं मत मांडतात. बोलताना पूर्ण जबाबदारीने बोलतात. अनावश्यक बडबड करत नाहीत, अशा लोकांचा हा समाज आदर करतो. तसेच समाजामध्ये अशा व्यक्तीच्या मताला देखील किंमत असते.

इतरांना मान-सन्मान द्या – चाणक्य म्हणतात समाजाचा हा नियमच आहे, तुम्ही जेव्हा इतरांना आदर द्याल, त्यांच्या कामाचं कौतुक कराल तेव्हा समोरचा व्यक्ती देखील तुमचा आदर करेल तुमच्या कामाचं कौतुक करेल. त्यामुळे समोर कोणीही असो, त्याच्याशी कधीही कठोर बोलू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वचन आणि कृती – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही शब्द देता, तेव्हा तुम्ही आपल्या शब्दावर ठाम राहा. तुम्ही समोरच्या व्यक्तीला दिलेलं वचन कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लोकांना केवळ पोकळ आश्वासन देऊ नका, जर तुम्ही तुमची आश्वासनं पूर्ण केली तर हा समाज आपोआप तुमचा आदर करू लागेल, तुमची किर्ती सर्वत्र पसरेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी