Chanakya Niti : माणसाने या गोष्टींचा अतिरेक केला तर आयुष्याची माती होते, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं जीवन कसं जगावं याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाने नेहमी समाधानी राहिलं पाहिजे, अन्यथा पश्चातापाची वेळ येते.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आयुष्य कसं जगावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आर्य चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाने नेहमी समाधानी असावं, अशा काही गोष्टी असतात, जिथे तुम्ही जर समाधानी नसाल तर आयुष्यात एक दिवस तुमच्यावर पश्चातापाची वेळ येते. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल समाधानी नसता, तेव्हा ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करतात. तुम्ही तहान, भूक विसरून जाता, फक्त त्या गोष्टीचा पाठपुरावा करता. तुमच्या आयुष्यामध्ये एक टप्पा असा देखील येतो की या गोष्टी तुम्हाला मिळतात देखील परंतु तोपर्यंत खूप उशिर झालेला असतो. तेव्हा तुमच्या लक्षात येत की आपलं आयुष्य तर जगायचं राहूनच गेलं, मात्र तेव्हा तुमच्या हातात फारसा वेळ नसतो. त्यामुळे आपल्याला जे प्राप्त झालं आहे, त्यामध्ये मानसाने समाधान मानायला शिकलं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत, त्यांच्या जर तुम्ही मागे लागलात किंवा हे असंच झालं पाहिजे अशी जर तुमची भूमिका असेल तर एक दिवस तुमच्यावर नक्कीच पश्चातापाची वेळ येऊ शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
संपत्ती- चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात संपत्ती ही कमावलीच पाहिजे, कारण तुमच्याकडे जर पैसा असेल तरच हा समाज तुम्हाला मान सन्मान देतो. लोकं तुमच्या जवळ येतात. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर हा समाज तुम्हाला कधीही मान -सन्मान देणार नाही. जवळचे नातेवाईक देखील तुमच्यापासून दुरावले जातील, त्यामुळे प्रत्येक माणसाने संपत्ती ही जमा केलीच पाहिजे. परंतु कधीही चुकीच्या मार्गाने संपत्ती जमा करू नये. संपत्तीचा अतिरिके हा तुम्हाला विनाशाकडे घेऊ जातो, त्यामुळे माणसाने नेहमी कष्टानेच पैसा कमावला पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
सत्तेचा अतिरेक – चाणक्य म्हणतात एखाद्या व्यक्तीकडे सत्ता असते, पद असतं. परंतु जेव्हा तुमच्याकडे सत्ता असते, तेव्हा खरं तर तुम्ही खूप नम्रतेनं वागणं अपेक्षित असतं, परंतु जेव्हा माणसाकडे पैसा येते, सत्ता येते तेव्हा माणूस निर्बंधा सारखा वागू लागतो. तो चुकीच्या पद्धतीने सत्तेचा उपभोग घेतो, अशा व्यक्तीचा विनाश अटळ असतो, त्यामुळे माणसाने कधीही सत्तेचा अतिरेक करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
