Chanakya Niti : भांडणं न करता, भीती न दाखवता समोरच्या व्यक्तीकडून आपलं काम कसं करून घ्यावं? चाणक्यांनी सांगितलं सोपं सूत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात या समाजात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीकडून आपलं काम करून घेणं ही एक फार मोठी गोष्ट असते.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात या समाजात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीकडून आपलं काम करून घेणं ही एक फार मोठी गोष्ट असते. अनेकदा नोकर लोकं मालकाचं ऐकत नाहीत, अशावेळी नोकरांकडून काम करून घ्यायचं असेल तर मालकाला कठोर भूमिका घ्यावी लागते, प्रसंगी नोकराला समज देखील द्यावी लागते. तर दुसरीकडे आपल्यापेक्षा जे वरिष्ठ लोकं असतात, ते देखील कधीकधी आपलं ऐकत नाही. आपली अडवणूक केली जाते, अशावेळी आपल्या मनात त्यांच्याबद्दल राग निर्माण होतो. मात्र कोणाशीही वाद न घालता, कोणाशीही भांडणं न करता आपल्याला आपलं काम करून घेता आलं पाहिजे, यासाठी चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
तुमची ताकद दाखवू नका तर तीची जाणीव करू द्या- चाणक्य म्हणतात तुमची ताकद दाखवण्यासाठी उगच एखाद्या व्यक्तीवर ओरडू नका, आरडा -ओरड करू नका. त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल असलेला आदर कमी होईल. परंतु तुम्ही जर शांत राहून ताकद दाखवण्यापेक्षा तीची जाणीव लोकांना करून दिली तर यामुळे दोन गोष्टी साध्य होतील, एक म्हणजे तुमच्याबद्दल लोकांच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण होईल, दुसरं म्हणजे आरडा-ओरड न करता देखील तुमची सर्व कामे आपोआप होतील.
आदेश देऊ नका, सूचना द्या – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून काम करून घ्यायचं असेल तर हे काम असंच करा म्हणून थेट आदेश देऊ नका, तर त्याऐवजी हे काम असं झालं तर आणखी चांगलं होईल अशी सूचना द्या, त्यामुळे तुमचे कर्मचारी ते काम आणखी उत्साहाने करतील, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
