
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटुनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. मानसानं आयुष्य कसं जगावं? आयुष्य जगत असताना काय करावं? याची अनेक उदाहारणं आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंंथामध्ये दिली आहे. आयुष्यात काय करावं? काय करू नये? कोणत्या लोकांची संगत चांगली आहे? कोणती संगत वाईट आहे? व्यक्तीची कर्तव्य काय आहेत? आपला शत्रू कोण? मित्र कोण? अशी एकना अनेक विचार आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत.
आर्य चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात, ज्या सवयी एकदा जर मानसाला लागल्या तर आयुष्यभर सुटत नाही. या सवयींमुळे व्यक्तीचं आयुष्य बरबाद होतं. त्यामुळे या सवयी ज्या लोकांना आहेत अशा व्यक्तींपासून तुम्ही कायम दूर राहिलं पाहिजे, त्यातच तुमचं हीत आहे, जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या आहेत त्या सवयी? आर्य चाणक्य यांनी काय म्हटलं आहे?
कामाचा कंटाळा – आर्य चाणक्य म्हणतात जे लोक नेहमी कामाचा कंटाळा करतात, अशा लोकांपासून दूरच राहा. कारण तुम्ही जर अशा लोकांसोबत राहिले तर ती सवय तुम्हाला देखील लागू शकते. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
व्यसनी लोकांपासून दूर राहा – आर्य चाणक्य म्हणतात व्यसन हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. व्यसनामुळे तुमच्या आयुष्याचं वाटोळ होतं. त्यामुळे तुम्ही व्यसन करता कामा नये, तसेच व्यसनी लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे, कारण ती सवय तुम्हालाही लागू शकते.
जुगार – आर्य चाणक्य म्हणतात जुगार ही एक वाईट सवय आहे, ही जर सवय तुम्हाला लागली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे जुगारी लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)