Chanakya Niti : या तीन गोष्टींवर खर्च करताना अजिबात मागे पुढे पाहू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्यावर खर्च करताना कधीही विचार केला नाही पाहिजे, अन्यथा तुमचं भविष्यात खूप मोठं नुकसान होऊ शकतं.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्यावर खर्च करताना किंवा अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करताना कधीही मागे-पुढे पाहिलं नाही पाहिजे. तुमची जेवढी ताकद आहे, तेवढा पैसा तुम्ही अशा गोष्टींवर खर्च केला पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींसाठी खर्च करण्यास हात आखडता घेतला तर भविष्यात तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. परंतु तु्म्ही जर आज या गोष्टींवर खर्च केला तर भविष्यात तुम्हाला किती तरी अधिक पटीने त्याची परतफेड मिळणार आहे. तुमचं भविष्य सुरक्षित होणार आहे. त्यामुळे आजची गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
शिक्षण – आर्य चाणक्य म्हणतात शिक्षणामध्ये संपूर्ण जग बदलण्याची ताकद आहे. ज्याला चांगलं शिक्षण मिळालं आहे, अशा व्यक्तीचं पुढचं आयुष्य हे अधिक सुखकर असतं. तो आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करू शकतो. तसेच त्याला जे शिक्षण मिळालं आहे, त्याच्या जोरावर त्याला भविष्यात रोजगाराच्या चांगल्या संधी देखील मिळू शकतात. त्याचं संपूर्ण आयुष्य आरामदायी होईल. परंतु ज्याने शिक्षण घेतलं नाही, अशा लोकाचं आयुष्य मात्र कालंतराने अधिक खडतर बनतं. अशा लोकांची कोणीही सहज फसवणूक करू शकतं. त्यामुळे आयुष्यात शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे, शिक्षणावर खर्च करताना कोणतीही काटकसर करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
नाती जपा – चाणक्य म्हणतात माणूस हा समूह प्राणी आहे, तो आपलं आयुष्य कधीच एकटा जगू शकत नाही. त्याच्याकडे कितीही पैसा असला, साधन संपत्ती असली तरी देखील तो एकटा जगू शकत नाही. त्याला नातेवाईक, मित्र यांची जगण्यासाठी गरज असतेच त्यामुळे नात्यापुढे कधीही पैशांचा विचार करू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
स्वत:त गुंतवणूक करा – चाणक्य म्हणतात माणसाने अनावश्यक खर्च टाळवा, परंतु ज्या गोष्टी खरच गरजेच्या आहेत, त्यामध्ये कोणतीही काटकसर करू नये. माणसाने स्वत:कडे देखील लक्ष दिलंच पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
