Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टींना पर्याय नाही, तुम्हाला त्या कराव्याच लागतील, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की काही गोष्टी या मानवी जीवनात अटळ असतात. त्या कोणालाच चुकल्या नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की मानवी जीवनात अशा काही गोष्टी आहेत, ज्या अटळ आहेत. या गोष्टी जगातील कोणत्याच माणसाला आजपर्यंत चुकवता आलेल्या नाहीत. या गोष्टींना दुसरा कोणता पर्याय देखील नाही. परंतु तरी देखील जो माणूस या गोष्टी चुकवून पहातो, त्यासाठी इतर मार्ग शॉर्टकट मार्ग वापरण्याचा प्रयत्न करतो, तो माणूस भविष्यात फार मोठ्या संकटात सापडतो. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तेव्हा अशा व्यक्तीच्या हातात पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही. माणसाचं पुढचं आयुष्य कसं असणार? हे त्याने आतापर्यंत काय कर्म केलं यावरूनच ठरलं जातं, त्यामुळे माणसाने नेहमी आपले कर्म चांगले ठेवावेत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य नेमकं काय म्हणतात?
कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात असा कोणताही व्यक्ती नाही, जो जन्माला आला आणि त्याला कष्ट करण्याची गरजच लागली नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कष्ट हे करावेच लागतात. मग तो माणूस रंक असो की राजा प्रत्येकाच्या आयुष्यात कष्ट हे असतातच. भलेही दोघांच्या संघर्षाचं स्वरूप वेगवेगळं असेल परंतु त्यांना कष्ट करावेच लागणार. उदाहरण द्यायचं झालं तर जो गरीब माणूस आहे, त्याला रोजच्या रोजीरोटीसाठी कष्ट करायचे आहेत, तर राजाला आपलं संपूर्ण राज्य टिकवून ठेवण्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यामुळ रंक असो की राजा प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कष्ट हे करावेच लागतात. तुमच्या वाट्याचे कष्ट कधीच कोणी टाळू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
प्रालब्ध – चाणक्य म्हणतात यालाच आपण नशीब असं म्हणतो. तुम्ही नशीबाला देखील टाळू शकत नाही. कधीकधी तुम्ही प्रचंड कष्ट करतात, परंतु ती जर वस्तू तुमच्या नशीबातच नसेल तर ती तुम्हाला कधीही मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला नशीबाची साथ देखील हवी असते, आणि ते तुम्ही कधीच टाळू शकत नाही, असं चाणक्य म्हणतात.
नातेसंबंध – चाणक्य म्हणतात माणूस जन्माला येतो, तेव्हा इथे त्याचं अनेक व्यक्तींशी कोणं न कोणतं तरी नातं असतं. तो हे नातेसंबंध कधीच टाळू शकत नाही, नातेसंबंध जपण्यासाठी त्याचे काही कर्तव्य असतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
