Chanakya Niti : या तीन गोष्टी आहे, जगातील सर्वात मोठं महापाप, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या महापाप समजल्या जातात. या गोष्टींपासून मानसानं नेहमी दूर रहावं. या गोष्टींना कधीही माफी मिळत नाही.

Chanakya Niti : या तीन गोष्टी आहे, जगातील सर्वात मोठं महापाप, चाणक्य काय सांगतात?
chakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 07, 2026 | 9:50 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्याला आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात जो व्यक्ती पुण्यवाण असतो, तोच व्यक्ती या जगात यशस्वी होतो. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात या तीन गोष्टी महापाप समजल्या जातात. तुम्ही तुमच्या आयुष्यात दुसरी एखादी चुकीची गोष्ट केली तर कदाचित तुम्हाला माफी मिळू शकेल, परंतु  या तीन गोष्टी अशा आहेत, या गोष्टींना आयुष्यात कधीही माफी मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आई वडिलांचा अनादर – चाणक्य म्हणतात पृथ्वीवरचे देव जर तुमच्यासाठी कोणी असतील तर ते म्हणजे तुमचे आई-वडील आहेत. आई -वडिलांमुळेच तुम्ही हे सुंदर जग बघू शकलात. तुम्हाला मोठं करण्यासाठी तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी तुमच्या आई-वडिलांनी प्रचंड कष्ट केलेले असतात. त्यामुळे म्हतारपणात त्यांचा चांगला सांभळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे. जो मुलगा आपल्या आई -वडिलांचा सांभाळ करतो. त्यांना आनंदी ठेवतो. तोच खरा मुलगा. परंतु जो मुलगा आपल्या आई-वडिलांना त्रास देतो, कष्ट देतो असा मुलगा हा मोठं पाप करत असतो.

पत्नीशी एकनिष्ठ – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचं लग्न होतं, तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीसोबत एकनिष्ठ राहिलं पाहिजे. दुसऱ्या महिलेचा विचार करता देखील कामा नये. जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत एकनिष्ठ नसाल तर तुम्ही जगातील सर्वात मोठं पाप करत आहात.

चोरी – चाणक्य म्हणतात चोरी हे जगातील तिसरं सर्वात मोठं महापाप आहे. त्यामुळे आयुष्यात कधीही चोरी करू नये. कारण तुम्ही जेव्हा चोरी करता तेव्हा एखाद्या व्यक्तीने कष्टाने कमावलेला पैसा चोरता त्यामुळे त्याचा तळतळटात तुम्हाला लागतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us