AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Ketan Agarwal Murder Case: लोहगड मर्डर मिस्ट्री प्रकरणात अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याला ढकलून देण्यापूर्वी सिया गोयलने एक क्रूर कृत्य केले. त्यातून केतन सावरू शकला नाही. नाहीतर कदाचित तो वाचण्यासाठी धडपड करू शकला असता, काय आहे तो अंदाज?

Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य... नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?
नाहीतर वाचला असता केतन?
| Updated on: Jun 24, 2026 | 10:51 PM
Share

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलच्या चेहऱ्यावरून ती इतकी क्रूर असेल असे वाटत नाही. तिचा यापूर्वीचा कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नाही अथवा ती कोणत्याही वेगळ्या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आलेले नाही. पण तिने ज्याप्रकारे केतन अग्रवाल याचा खून केला, त्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे. कोणत्याही प्रकारे आणि लवकरात लवकर तिला केतनचा काटा काढायचा होता. यासाठी तिने होणाऱ्या नवऱ्याचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्याचा लोहगड किल्ल्यावरून दरीत खोल ढकलून खून केला. पण दरीत धक्का देण्यापूर्वी सियाने ते क्रूर कृत्य केले… काय केले होते सियाने?

अगोदर डोक्यावर वार… मग 400 फूट खोल दरीत फेकले

लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतन अग्रवाल, सिया गोयल हे त्यांच्या मित्रासह पोहचले. त्यांच्यासोबत चेतन चौधरी हा ही किल्ल्यावर होता. संधी साधून सिया गोयल केतनला घेऊन एका निर्जन स्थळाकडे घेऊन आली. तिथून खाली खोल दरी होती. तिथे तिने केतनला बोलण्यात गुंतवले आणि कोणत्या तरी जड वस्तूने तिने केतनच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या जबरदस्त माऱ्याने आणि अचानक हल्ल्याने केतन गोंधळलेला असतानाच सिया गोयलने त्याला जोराचा धक्का दिला आणि तो थेट 400 फूट खोल दरीत पडला, याविषयीची माहिती केतनचे वडील अनिल अग्रवाल यांनी दिली. कोणालाही शंका येऊ नये यासाठीच आरोपी चेतन चौधरी हा दुचाकीवर लोहगड किल्ल्याजवळ आल्याचे ते म्हणाले. कदाचित जर हा हल्ला केतनला चुकवता आला असता तर धडपड करून तो वाचला असता असेही अग्रवाल कुटुंबाला वाटते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सियाला मुलाशी लग्न करायचे नव्हते. तर तिने अगोदरच सांगायचे होते, आम्ही लागलीच हा संबंध तोडला असता, मुलाला इतक्या निर्घृणपणे मारले, अशी क्रूर मानसिकता येते कुठून? हा तिच्या संस्काराचा भाग आहे का, असा संतप्त सवाल अनिल अग्रवाल यांनी केला.

साखरपुड्यानंतर मृत्यूचे काऊंटडाऊन

पोलिसांचा आरोप आहे की, साखरपुड्यानंतर सिया आणि चेतन सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांनी मिळून केतनचा खून करण्याची योजना आखली. त्यानंतर सियाने केतनचा पासपोर्ट लपवाल. त्याच्या मागे बाली येथील त्यांचे प्री वेडिंड शूट ट्रिप रद्द केली. त्यानंतर केतनला मारण्याचा तीनदा प्रयत्न फसला. त्यानंतर आरोपी वारंवार लोहगड किल्ल्यावर गेले आणि केतनला कुठे मारायचे याचे ठिकाण त्यांनी निश्चित केले. 19 जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवसापूर्वी 18 जून रोजी ट्रेकिंगच्या बहाण्याने त्याचा खून केला.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप