AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cast Fees: सनी देओलवर पैशांचा पाऊस, प्रीती झिंटालाही कोट्यवधी; ‘बंटवारा 1947’च्या स्टारकास्टची कमाई किती?

Batwara 1947 Cast Fees: सनी देओलच्या 'बंटवारा 1947' या आगामी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता असून, येत्या शुक्रवारी म्हणजेच 14 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. याचदरम्यान चित्रपटाच्या स्टारकास्टच्या फी बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

| Updated on: Aug 11, 2026 | 7:49 AM
Share
Batwara 1927 Star Cast Fees : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री प्रीति  झिंटा परत एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बंटवारा 1947’ या चित्रपटात दोघांनी काम केलं असून तो लौकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आधी या चित्रपटाचं नाव ‘लाहौर 1947’ असं ठेवण्यात आलं होतं, मात्र अखेर ते बदलण्यात आलं. 14 ऑगस्टला चित्रपट रिलीज होणार असून त्याआधीच या चित्रपटाचं बजेट आणि स्टारकास्टच्या फीबद्दल रिपोर्ट्समधून माहिती समोर आली आहे.

1 / 6
रिपोर्ट्सनुसार, ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाचं बजेट थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 150 कोटी आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या अभिनेता सनी देओलवर पैशांचा पाऊस पडला असून सर्वाधिक मानधन त्याचंच आहे.लीड रोल साकारण्यासाठी सनी देओलने तब्बल 60 कोटी रुपये फी घेतल्याचे सांगितले जात आहे. तर, या चित्रपटाद्वारे, दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर दमदार प्रमुख भूमिकेत पुनरागमन करणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिला 10 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 6
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी याही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या फीबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे, अभिनेता अली फजल या चित्रपटात स्पेशल अपीयरन्समध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अली फजलने आपल्या भूमिकेसाठी जवळपास 7 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

3 / 6
 चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, ‘बंटवारा 1947’ हा चित्रपट, प्रसिद्ध लेखक असगर वजाहत यांच्या गाजलेल्या उर्दू कलाकृती ‘जिस लाहौर नइ वेख्या ओ जम्याइ नइ’ वरून प्रेरित आहे. 1947 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतरच्या लाहोरच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचे समजते. सनी देओल आणि प्रीती झिंटा यांनी यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून, आता यातून ते पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.  त्यामुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

4 / 6
सनी देओल, प्रीती झिंटा आणि शबाना आझमी यांच्याशिवाय या चित्रपटात, अभिनेता करण देओल, कनिका कपूर आणि अभिमन्यू सिंह हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले असून, गाण्यांचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या कथेसोबतच संगीताबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

5 / 6
येत्या 14 ऑगस्ट रोजी ‘बंटवारा 1947’ हा पिक्चर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर अभिनेता इमरान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित ‘आवारापन 2’ या चित्रपटाशी होणार आहे. त्यामुळे सनी देओल आणि प्रीती झिंटाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता असतानाच, या दोन्ही चित्रपटांमधील बॉक्स ऑफिसवरील संघर्षाकडेही प्रेक्षकांचं लक्ष असून, दोन्हींसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा