AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओचं मोठं सरप्राईज, आणलं सर्वात स्वस्त रिचार्ज, 3 वर्षांसाठी कॉलिंग, डेटा अन् एसएमएस मिळणार फ्री

जिओनं आपल्या ग्राहकांना मोठं सरप्राईज दिलं आहे. जीओचं सर्वात स्वस्त रिचार्ज मार्केटमध्ये आलं असून, यामध्ये ग्राहकांना तब्बल तीन वर्ष अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा अन् एसएमस सुविधा मिळणार आहे.

जिओचं मोठं सरप्राईज, आणलं सर्वात स्वस्त रिचार्ज, 3 वर्षांसाठी कॉलिंग, डेटा अन् एसएमएस मिळणार फ्री
jio recharge Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 4:05 PM
Share

रिलायन्स जिओने आता आपल्या ग्राहकांसाठी एक स्पेशल रिचार्ज प्लॅन मार्केटमध्ये आणला आहे. हे रिचार्ज प्रिपेड सेगमेंट असून, या प्लॅनची व्हॅलिडिटी तब्बल तीन वर्ष आहे. जे ग्राहक जिओच्या या प्लॅनची निवड करतील त्यांना तीन वर्षांच्या काळामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 2.5 GB डेटा पर डे तसेच प्रत्येक दिवशी 100 एसएमएस फ्री या सुविधा मिळणार आहेत. या सुविधांसोबतच अन्य काही सुविधा देखील कंपनीकडून अगदी मोफत दिल्या जाणार आहेत. हा प्लॅन जिओच्या इतर प्लॅनपेक्षा चांगलाच स्वस्त आहे. तुम्हाला अवघ्या दहा हजार रुपयांच्या रिचार्जमध्ये तीन वर्ष अगदी मोफत अनलिमिटेड कॉल, टेडा आणि रिचार्ज मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅनमुळे आता जिओच्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

जिओच्या या दहा हजार रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना तीन वर्ष म्हणजेच तब्बल 36 महिने अगदी मोफत अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, तसेच 2.5 GB डेटा पर डे मिळणार आहे. याचा हिशोब केल्यास तीन वर्षांच्या काळात ग्राहकांना जिओकडून 2737.5 GB डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच एसएमएसची सुविधा देखील फ्री देण्यात आली आहे.या प्लॅनचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे यामध्ये रोमिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, म्हणजे समजा तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा शहरात जरी शिफ्ट झालात तरी देखील तुम्हाला या रिचार्जचा लाभ मिळणार आहे.

जीओच्या दहा हजार रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकीकडे अनलिमिटेड कॉलिंग सुविधा, पर डे अडीच जीबी डेटा, प्रति दिवस शंभर एसएमएस या सुविधा तर मिळणारच आहेत, परंतु त्याचसोबत इतरही काही खास ऑफर जिओकडून मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जीओ हॉटस्टारच फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एकदाच दहा हजार रुपये मोजावे लागणार आहेत, त्यानंतर एकही रुपया भरण्याची गरज नाही. तुम्हाला तीन वर्षांसाठी सर्व सुविधा फ्री मिळणार आहेत. आता ग्राहक जिओच्या या नव्या रिचार्जला कसा प्रतिसाद देतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण