AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup News: आशिया कपच्या तोंडावर टीम इंडियात मोठा बदल! उपकर्णधार रजत पाटीदारने अचानक नाव मागे घेतलं अन् ‘या’ 2 धुरंधर खेळाडूंचं नशीब फळफळलं

Rising Stars Asia Cup Rajat Patidar News: रजत पाटीदारची एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी निवड झाली होती. पण आता त्याला संघातून वगळण्यात आले आहे. संघात त्याच्या जागी आयुष बडोनीला स्थान देण्यात आले आहे.

Asia Cup News: आशिया कपच्या तोंडावर टीम इंडियात मोठा बदल! उपकर्णधार रजत पाटीदारने अचानक नाव मागे घेतलं अन् 'या' 2 धुरंधर खेळाडूंचं नशीब फळफळलं
Rajat Patidar Exits India A Squad Ahead of Asia Cup
| Updated on: Nov 08, 2026 | 3:53 PM
Share

रायझिंग स्टार्स आशिया कपबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयने भारतीय संघात बदल केले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रजत पाटीदारने सध्या 50 षटकांच्या क्रिकेटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले आहे की, सध्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी आणि तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला एकदिवसीय क्रिकेटसाठी निवडीकरिता उपलब्ध मानू नये.

परिणामी त्याला रायझिंग स्टार्स आशिया कपसाठीच्या ‘इंडिया ए’ संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी आयुष बडोनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने 8 नोव्हेंबर रोजी ही अधिकृत घोषणा केली. रजत पाटीदारला वगळल्यानंतर निवड समितीने रिंकू सिंगची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी पाटीदारकडे ही जबाबदारी होती, तर तिलक वर्मा कर्णधार होता.

आता तिलक वर्मा संघाचे कर्णधारपद भूषवेल, तर रिंकू सिंग उपकर्णधार म्हणून काम पाहील. पाटीदारच्या जागी १५ सदस्यीय संघात आयुष बडोनीचा समावेश करण्यात आला आहे. रायझिंग स्टार्स आशिया कपसाठीच्या भारताच्या अपडेट संघात फलंदाज म्हणून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांचा समावेश आहे. प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि आयुष बडोनी यांचाही संघात समावेश आहे. गोलंदाजी विभागात हर्षित राणा, प्रिन्स यादव आणि अर्शद खान यांचा समावेश आहे.

रायझिंग स्टार्स आशिया कप कतारमध्ये आयोजित केला जाईल आणि ही स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी सुरू होईल. भारत ‘अ’ संघाला पाकिस्तान ‘अ’, नेपाळ आणि युएई यांच्यासोबत गट ‘ब’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 20 नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध खेळेल.

भारत अ चा अपडेट संघ अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिंस यादव, अर्शद खान आणि आयुष बडोनी

Follow Us
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण