AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : मिस्ट्री गर्लसोबत व्हिडीओ, बायकोच्या आरोपांवर गोविंदा म्हणतो, ‘माझ्यावर लादलेली एक अट म्हणून…’

Govinda : मिस्ट्री गर्लसोबत व्हिडीओ व्हायरल होताच गोविंदाचं स्पष्टीकरण, लागलेल्या एक अटीमुळे अभिनेता शांत, बायकोने केलेल्या गंभीर आरोपांवर देखील गोविंदाने सोडलं मौन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Govinda : मिस्ट्री गर्लसोबत व्हिडीओ, बायकोच्या आरोपांवर गोविंदा म्हणतो, 'माझ्यावर लादलेली एक अट म्हणून...'
अभिनेता गोविंदा
| Updated on: Aug 10, 2026 | 9:25 AM
Share

Govinda : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा याची बायको सुनीता आहुजा हिने गोविंदा यांचे अनेक महिलांसोबत अफेअर आहे… असे गंभीर आरोप केले, अशात एका मुलीसोबत अभिनेत्याच्या व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. कोमल असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र फक्त गोविंदा आणि कोमल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत सुनीताने सांगितलेलं, ‘कोमल नावाचा मला प्रचंड तिरस्कार आहे…’, यावर आता गोविंदा याने स्पष्टीकरण दिलं आहे.

सांगायचं झालं तर, गोविंदाच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले आहेत. यातील नेमके सत्य कोणालाच माहीत नाही, परंतु आता अभिनेत्याने आपल्या कथित अफेअरच्या अफवा आणि पत्नी सुनीता हिने केलेले आरोप यांवर मोकळेपणाने भाष्य केलं आहे. जेव्हा गोविंदाला त्या अभिनेत्रीचं नाव सांगण्यास सांगितलं गेलं, जिच्याशी त्याचं अफेअर असल्याची चर्चा होती, तेव्हा अभिनेत्याने संबंधित महिलेचं नाव घेण्यास स्पष्ट नकार दिला.

गोविंदा म्हणाला, ‘मी कोणत्याच महिलेचं नाव कधीच घेणार नाही. कारण मला सांगण्यात आलं आहे की, मुलीचं नाव घेऊन तिला बदनाम करायचं नाही. माझ्यावर लादलेली एक अट आहे, त्यामुळे मी माझ्या सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत नाहीये… मला नेहमीच असं वाटलं आहे की, जेव्हा मी प्रेमापोटी एखादी कृती करतो, तेव्हा ती कधीच वासनेतून प्रेरित झाल्यासारखी वाटत नाही. प्रेम ही एक वेगळी आणि दैवी अशी अनुभूती आहे.

बायको करत असलेल्या आरोपांवर गोविंदा म्हणाला, ‘ती मला प्रेमाने शिव्या देते, तर त्या शिव्या मी मान्य करतो… कारण मला असं वाटतं, देवाने प्रत्येकाला त्याचं एक वेगळं व्यक्तित्व दिलं आहे, प्रत्येक ठिकाणी एका खास व्यक्तीला उपस्थित केलं आहे. आज जर सुनीता नसती तर प्रसिद्धी मिळालीच नसती. आज आमच्या कुटुंबातील मुलं उच्च स्थानावर आहेत, ते फक्त आणि फक्त सुनीता हिच्यामुळे. याचं सर्व श्रेय मी सुनीताला देतो.’

गोविंदाचा व्हिडीओ

बायको सुनीता अहुजावर नाराज आहे गोविंदा?

सुनीता कायम गोविंदावर निशाणा साधत असते, यावर अभिनेता म्हणाला, ‘अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या कधीच शब्दात सांगू शकत नाही. जर मी सांगण्याचा प्रयत्न केला तर, दुरावा निर्माण करण्यासाठी आरोप करणं गरजेचं आहे? पण सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी व्यक्ती बाहेर पडण्याचा पर्यात निवडतो. यश मिळवण्यासाठी आपल्या लोकांना वाईट करणं गरजेचं आहे? सुनिता असं करत आहे.’

गोविंदा पुढे म्हणाला, ‘दुसऱ्याला वाईट ठरवणं थोडं सोपं असतं. मी माझ्याबद्दल चार गोष्टी चांगल्या सांगते आणि एक गोष्ट माझ्याबद्दल वाईट सांगते… तर त्यामधील प्रेम मला दिसून येत…’, सांगायचं झालं तर, गोविंदा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गोविंदा याचे ‘रुपा’ आणि ‘दुनियादारी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा