Abhijeet Dipke : …तर आईने माझा जीव घेतला असता; अभिजीत दिपके विमानतळावर सापडले संकटात, नेमकं काय घडलं?
अभिजीत दिपके हे कोची विमानतळावर संकटात सापडले होते. त्यांना संपूर्ण रात्र विमानतळावर काढावी लागली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या.

आज संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी कॉक्रोच जनता पार्टीची कोच्चीमध्ये रॅली झाली. कोचीमधील रॅलीत अभिजीत दिपके सहभागी झाले होते. कोचीवरून परतताना दिपके मोठया संकटात सापडले होते. त्यांना विमानतळावर अनेक अडचणीचा सामना करावा लागला. अनीश गावंडे यांच्या एका पोस्टवर उत्तर देताना अभिजीत दिपकेंनी संपूर्ण रात्र कोची विमानतळावर काढावी लागल्याचे सांगितलं.
गावंडे यांनी म्हटलं की, मला दिवाळीच्या दिवशी विमानतळावर जाण्यास आवडते. नीटनेटके पारंपारिक कपडे घालून विमानतळावर जाणे, एकमेकांना आनंदात पाहण्यास चांगले वाटते. तुमचा मुड चांगला असेल, तर विमानतळावर वेळ घालवणे आनंददायी वाटेल. तुम्ही एअर इंडियावर कितीही टीका करा. ती माझी जगातील सर्वात आवडती एअरलाइन आहे. विमानात क्रू मेंबरच्या स्माइलपेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. एकदम घरासारखं वातावरण असतं’.
गावंडे यांची पोस्ट रिपोस्ट करत अभिजीत दिपकेंनी म्हटलं की, मला संपूर्ण रात्र ही विमानतळावर काढली. झोप पूर्ण झाली नव्हती. मी माझ्या उशिरा येणार्या फ्लाइटची वाट पाहत होतो. कोचीमधील रॅलीहून लवकरत घरी जाण्याच्या प्रयत्नात होतो. मी दिवाळीच्या घरी पोहोचलो नसतो, तर आईने जीव घेतला असता. सणाच्या दिवशी चांगला अनुभव मिळाला’. तसेच अभिजीत दिपकेंनी दिवाळीसाठी एक वेगळी पोस्ट केली. त्यात म्हटलं की, तुम्हा सर्वांना कलहमुक्त दिवाळीच्या शुभेच्छा’.
अभिजीत दिपकेंचा केरळमध्ये मोठा दावा
अभिजीत दिपकेंनी केरळमध्ये मोठा दावा केला. दिपकेंनी म्हटलं की, 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचले जाईल. लोकांनी केंद्रातील सत्तापालटासाठी तयार राहावं. मतदारयांद्याची दुरुस्ती (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीच्या रॅलीत अभिजीत दिपकेंनी सहभाग नोंदवला. या रॅलीत दिपके म्हणाले, ‘सत्ता बदल हा फक्त निवडणुकीद्वारे शक्य आहे. देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक सिस्टिम असायला हवी. त्यांनी यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली’. नरेंद्र मोदी सत्तेत राहणार का, यावर दिपके म्हणाले, तुम्ही सर्वांनी 2029 साठी तयार राहावे. मोदी नक्कीच सत्तेतून बाहेर पडतील. 2029 मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता जाणार का, असा प्रश्न आंदोलकांना विचारला. त्यावेळी आंदोलकांनी सहमती दर्शवत पाठिंबा दर्शवला. सत्ता बदल हा निवडणुकांमधूनच होईल, असेही दिपकेंनी स्पष्ट केले.
