AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: ‘रामायण’ सिनेमात साई पल्लवीचे ॲक्शन सीन्स, दीपिका चिखलिया यांचा संताप, खणखणीत उत्तर देत म्हणाल्या..

Dipika Chikhlia on Sita Action Scenes in Ramayana: "सीतेने ॲक्शन सीन्स केले? मला तर..." नितेश तिवारीच्या 'रामायण'वर दीपिका चिखलिया यांनी खणखणीत उत्तर दिलं आहे सिनेमात साई पल्लवी हिचे काही ॲक्शन सीन्स आहेत, ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून दीपिका चिखलिया यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

Ramayana: 'रामायण' सिनेमात साई पल्लवीचे ॲक्शन सीन्स, दीपिका चिखलिया यांचा संताप, खणखणीत उत्तर देत म्हणाल्या..
Sai Pallavi Deepika Chikhalia
| Updated on: Nov 08, 2026 | 11:23 AM
Share

Dipika Chikhlia on Sita Action Scenes in Ramayana: टीव्ही विश्वाचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत माता सीता यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारत दीपिका यांना चाहत्यांच्या मनावर आणि छोट्या पडद्यावर राज्य केलं. आज देखील प्रेक्षक दीपिका आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकेला विसरलेले नाही. हेच कारण आहे, ज्यामुळे नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ सिनेमाची तुलना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेशी होत आहे.

सांगायचं झालं तर, नितेश तिवारी यांच्या सिनेमात सीतेची भूमिका अभिनेत्री साई पल्लवी हिने साकारली आहे. सिनेमा 5 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून, सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. तर सिनेमात साई हिच्यावर ॲक्शन सीन्स चित्रित करण्यात आले आहेत. ज्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर काही लोकांना हा सीन बिलकूल आवडलेला नाही. एवढंच नाही तर, अनेकांनी सिनेमाच्या दिग्दर्शकाला ट्रोल केलं आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, माता सीता यांना कधीच एका योद्धा प्रमाणे दाखवण्यात आलेलं नाही.

साईच्या भूमिकेवर दीपिका चिखलिया यांची भूमिका?

साई पल्लवीच्या या ॲक्शन सीनवर दीपिका चिखलिया यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं. त्यांना रामायणात अशा प्रकारच्या सीनबद्दल आठवत नाही. जेव्हा दीपिका यांना विचारण्यात आलं की, सिनेमाच सीतेला ॲक्शन करताना दाखवण्यात आलं आहे आणि या सीनबाबत लोकांची वेगवेगळी मते आहेत, तेव्हा त्या म्हणाल्या – होय, मी इंस्टाग्रामवर तो ॲक्शन सीन पाहिला आहे.

‘मला खरोखर माहीत नाही की यावर काय बोलू. मला वाल्मीकि रामायण आणि तुलसीदास यांची रामायण आठवते. आमच्या रामायणातही बहुतेक याच ग्रंथांचा भाग होता. परंतु, मला आठवत नाही की कुठेही अशा प्रकारचे सीन दाखवले गेले असावेत. तसे पाहिल्यास, आपल्या देशात 300 पेक्षा जास्त रामायण आहेत. प्रत्येक कथा आणि प्रत्येक रामायण एकमेकांपासून काही प्रमाणात वेगळे आहे. कदाचित सिनेमाच्या मेकर्सनी इतर कोणत्याही रामायणातून असा काही भाग घेतला असेल, ज्याची मला माहिती नाही.’

दीपिकाने पाहिली आहे का नवीन रामायण?

जेव्हा दीपिका यांना विचारण्यात आलं की, त्यांनी नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा सिनेमा पाहिला आहे का, तेव्हा त्या म्हणाल्या की नाही, मी पुढच्या आठवड्यात जाईन. मला वाटतं की दिवाळीनंतर सिनेमा पाहीन. मला खात्री आहे की सिनेमा खूप भव्य असेल. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दीपिका चिखलिया यांच्या ‘नोटिस’ या नवीन सिनेमाच अरुण गोविल सुद्धा पाहायला मिळत आहेत. हा सिनेमा वेव्स ओटीटी’ (Waves OTT) वर रिलीज झाला आहे.

Follow Us
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी