
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. व्यक्तीने आपलं आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत? याचा एक आदर्श वस्तुपाठ चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामधून घालून दिला आहे. आदर्श राजा कसा असावा? आदर्श प्रजा कशी असावी? कोणत्या सवयी वाईट आहेत? कोणत्या सवयी चांगल्या आहेत. मित्र कोणाला म्हणावं? शत्रू कसा ओळखावा? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? पतीची कर्तव्य कोणती? अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
दरम्यान आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात या सवयी जर तुम्हालाही असतील तर त्याचा आजच त्याग करा, त्यातच तुमचं हीत आहे. कारण या गोष्टी तुमच्या श्रीमंतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते.
आळस – आर्य चाणक्य म्हणतात आळस हा मानसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, पैसा कमवायचा असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर कष्ट केले. तरच तुम्हाला पैशांची प्राप्ती होईल. तुमचं आयुष्य सुखकर होईल, त्यामुळे आळस नावाच्या गोष्टीला तुमच्या आसपासही फटकू देऊ नका.
जुगार – आर्य चाणक्य म्हणतात जागात व्यक्तीचं जुगारीमुळे जेवढं नुकसान होतं, तेवढं इतर कोणत्याही गोष्टीमुळे होत नाही. जुगाराच्या नादी लागलेला व्यक्ती प्रसंगी घरदार विकून देखील जुगार खेळतो. त्यामुळे जुगारीपासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे.
व्यसन – आर्य चाणक्य म्हणतात कधीही व्यसनांच्या नादी लागू नका, व्यसनामुळे व्यक्तीचं प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे आयुष्यात कधीही व्यसन करू नका.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)