Chanakya Niti : कोणत्या चुका माफ करायच्या अन् कोणत्या नाही? चाणक्य यांनी सांगितलं सोपं सूत्रं
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात काही लोकांच्या हातून नकळत चुका होतात, अशा लोकांना आपण एकदा तरी माफ केलंच पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील माणसाला आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक माणसं भेटतात. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. काही लोक नकळत आपला खूप मोठा फायदा करून जातात. तर काही लोक फक्त आपल्या वाईटावरच टपलेले असतात. आपलं वाईट कसं होईल याचाच विचार हे लोक करत असतात. अशा लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं असतं. कारण अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिला नाहीत तर मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यावेळी तुमच्या हातात वेळ देखील राहणार नाही. परंतु या समाजात असे देखील काही लोक असतात, ज्या लोकांना तुमचं वाईट करायचं नसतं. परंतु अजानतेपणे त्यांच्या हातून अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे तुम्ही दुखावले जातात. तुमचं नुकसान होतं. परंतु अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात आणखी एक संधी ही दिलीच पाहिजे. चला तर मग आज जाणून घेऊयात कोणत्या चुकांना माफ करावं आणि कोणत्या नाही, याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती मध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
कोणाला माफ करावं? चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. काही लोक हे आपल्याबद्दल खूप चांगला विचार करणारे असतात. आपलं नेहमी भलं व्हावं असंच त्यांना वाटत असतं. परंतु कधी-कधी आपल्या आयुष्यात असे देखील लोक येतात, जे कायम तुमच्याबद्दल चांगला विचार करत असतात. परंतु कधी-कधी त्यांच्या हातून अशी चूक होते, ज्याचा फटका तुम्हाला बसतो. परंतु अशा लोकांना पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं असतं. अशा लोकांना एकदा तरी माफ केलंच पाहिजे.
कोणाला माफ केलं नाही पाहिजे- चाणक्य म्हणतात जे लोक मुद्दाम तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांच्या मनात कपट आहे. ज्यांना तुम्ही एकदा माफ केलं आहे. परंतु वारंवार ते तीच चूक पुन्हा -पुन्हा करत आहेत. अशा लोकांना कधीही माफ करू नका, कारण यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, अशा लोकांशी असलेले सर्व संबंध तोडून टाका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
