AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: धनत्रयोदशीला करा धन्याचे ‘हे’ उपाय, घरातली आर्थिक चणचण जाईल निघून

धनत्रयोदशी हा दिवाळीतील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान धन्वन्तरी यांची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या काही उपायांनी आर्थिक चणचण दूर होते.

Diwali 2022: धनत्रयोदशीला करा धन्याचे 'हे' उपाय, घरातली आर्थिक चणचण जाईल निघून
धनतेरस Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 18, 2022 | 4:09 PM
Share

मुंबई,  धनत्रयोदशीच्या (Ddhanteras 2022) दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा (Lakshmi Puja 2022) केली जाते आणि या दिवशी खरेदी आणि दान करणे देखील शुभ मानले जाते. हा दिवस धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती म्हणूनही ओळखला जातो. यावेळी 23 ऑक्टोबर, रविवारी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी आयुर्वेदिक औषधाचे जनक धन्वंतरी देव समुद्रमंथनातून प्रकट झाले आणि प्रकट होण्याच्या वेळी त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. त्यामुळेच या दिवशी भांडी खरेदी केली जातात. असे म्हटले जाते की या दिवशी भांडी खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि घरात सुख-समृद्धीसाठी उपाय केले तर ते खूप प्रभावी मानले जाते. चला जाणून घेऊया धन्यासंबंधित उपाय

 धनत्रयोदशीला धन्याचे उपाय

धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करा आणि संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून गूळ आणि धन्याचा नैवैद्य दाखवा. यापैकी काही दाणे घरातील बागांमध्ये पेरा. मान्यतेनुसार या दिवशी बियांपासून उगवलेली कोथिंबीर घरात सुख-समृद्धी आणते.

वास्तुशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याचा उपाय केल्याने अनेक फायदे होतात.  या दिवशी धने  खरेदी करून घरी आणावे. देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांना धने अर्पण करून तुमची इच्छा सांगा आणि नंतर घरातील एखाद्या ठिकाणी धने मातीत गाडून टाका. यानंतर काही धने  लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने घरात कायम लक्ष्मीचा वास राहतो.

धनत्रयोदशी 2022 शुभ मुहूर्त

  1. कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी सुरू होते – 22 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6.02 वा.
  2. कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी तारीख संपेल – 23 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6.03 पर्यंत
  3. धन्वंतरी देव पूजनाची शुभ वेळ – 23 ऑक्टोबर 2022 ते रविवार, संख्याकाळी 5.44  – संख्याकाळी 06.05
  4. शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी – 21 मिनिटे
  5. प्रदोष काळ : संध्याकाळी 5.44 ते रात्री 8.16

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक