
आपण अनेकदा हे पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की घरात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले कि त्या व्यक्तिच्या संबंधित गोष्टीही कधीही घरात ठेवू नयेत. पण त्याचसोबत असेही म्हटले जाते की मृत व्यक्तीशी संबंधीत वस्तूही वापरू नयेत. कारण त्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये त्यांची ऊर्जा अनुभवता येते. त्यांचा वापर केल्याने नकारात्मक परिणाम आणि पितृदोष होऊ शकतो तसेच त्यांचे आभासही जाणवतात. म्हणून, मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काही वस्तू वापरणे टाळले पाहिजे.
शास्त्रांमध्ये जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये सांगितली गेली आहेत. असे म्हटले जाते की मृत्यूनंतरही, व्यक्तीची काही ऊर्जा त्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये राहते. मृत व्यक्तीच्या वस्तू वापरल्याने जीवनात नकारात्मक परिणाम वाढतात. असे केल्याने पितृदोषाचा धोका वाढतो. पितृदोष एखाद्या व्यक्तीचे सुख नष्ट करू शकतो. तसेच त्याचा आयुष्यावरही नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे अनेक संकटे येऊ शकतात. तर मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत हे जाणून घेऊया.
मृत व्यक्तीच्या या वस्तू कधीही वापरू नयेत
मृत व्यक्तीचे कपडे
मृत व्यक्तीने वापरलेले कपडे घालणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की मृताची ऊर्जा कपड्यांमध्ये असते. आणि हे कपडे जर इतरांनी वापरल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. हे कपडे घालल्याने अचानक मानसिक ताण जाणवू शकतो किंवा आजारपण येऊ शकते.
दागिने वापरावे का?
मृत व्यक्तीचे दागिने कितीही मौल्यवान असले तरी, ते सतत घालणे योग्य नाही. दागिने शरीराच्या संपर्कात येताच एक विशिष्ट ऊर्जा टिकवून ठेवतात. जेव्हा या वस्तू दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येतात तेव्हा ती ऊर्जा त्यांच्या नशिबावर नकारात्मक परिणाम करू शकते. आठवण म्हणून त्यांचे दागिने जतन करणे योग्य आहे पण ते वारंवार वापरणे टाळावे.
घड्याळ घालू नये
मृत व्यक्तीचे घड्याळ घालणे देखील अयोग्य मानले जाते. असे मानले जाते की घड्याळ घालणे म्हणजे मृत व्यक्तीचे अपूर्ण काम पूर्ण करणे होय. यामुळे जीवनात अडथळे, विलंब किंवा दुर्दैव येऊ शकते .
बूट, चप्पल वापरणे टाळावे
मृत व्यक्तीचे बूट, चप्पलही कधीही घालू नयेत. असे केल्याने घरात दुःख, गरिबी आणि नकारात्मकता येऊ शकते.
मृत व्यक्तीने वापरलेली भांडी
मृत व्यक्तीने वापरलेली भांडी देखील त्यांची आठवण म्हणून अनेकजण घरी सांभाळून ठेवतात. पण तसे करणे चुकीचे आहे.
मृत व्यक्तीने वापरलेली भांडी कधीही वापरण्यासाठी घेऊ नयेत. ती मोडावीत किंवा विसर्जित करावीत. मृत व्यक्तीची ऊर्जा त्या भांड्यांमध्ये असते. अशी भांडी वापरल्याने अनेक गोष्टी बिघडू शकतात. त्याचा परिणाम आयुष्यावर होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)