AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ji | बजरंगबलीची कृपा हवी असेल तर मंगळवारच्या दिवशी ‘हे’ उपाय करा

मंगळवारचा (Tuesday) दिवस हनुमानजींना समर्पित मानला जातो (Worship Lord Hanuman For Good Luck). हिंदू धर्मात (Hindu Religion) हनुमानजींना विशेष महत्त्व प्राप्त आहे.

Hanuman Ji | बजरंगबलीची कृपा हवी असेल तर मंगळवारच्या दिवशी ‘हे’ उपाय करा
Hanuman
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 06, 2021 | 4:29 PM
Share

मुंबई : मंगळवारचा (Tuesday) दिवस हनुमानजींना समर्पित मानला जातो (Worship Lord Hanuman For Good Luck). हिंदू धर्मात (Hindu Religion) हनुमानजींना विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की, मंगळवारी हनुमानजींची पूजा, उपासना, मंत्र आणि चालीसा (Hanuman Chalisa) पठन केल्याने भक्तांची सर्व कष्ट दूर होतात आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते (Do These Upay On Tuesday And Worship Lord Hanuman For Good Luck And Wealth).

धार्मिक मान्यतेनुसार, श्रीरामांच्या (Lord Ram) आज्ञेचं पालन करत आजही हनुमानजी भक्तांची रक्षा आणि कल्याणासाठी पृथ्वीतलावर निवास करतात आणि कितीही मोठी समस्या असेल तरी ती त्याचं निवारण हनुमानजींची पूजा केल्याने होते. हनुमानजींच्या कृपेने धन, विजय आणि आरोग्याची प्राप्ती होते. मान्यता आहे की, ज्या लोकांना आर्थिक समस्या असते ते किंवा जे लोक गेल्या अनेक काळापासून यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांनी मंगलवारच्या दिवशी काही खास उपाय करावे –

सर्व दु:खातून मुक्ती मिळेल

मान्‍यता आहे की, प्रत्येक मंगळवारी हनुमानजींचं शेंदुराने पूजन केल्याने सर्व दु:खातून मुक्ती मिळते. मंगळवारी सकाली वटवृक्षाचं एक पान तोडून गंगा जलने धुवून हनुमानजींनाअर्पण केल्यावर संपत्तीत वाढ होते. आर्थिक संकटं दूर होतात.

मंगळवारी हे करा –

मंगळवारी पानाचा विडा नियमाने अर्पित केल्याने रोजगाराचे मार्ग मोकळे होतात. नोकरी करणाऱ्या लोकांची प्रगती होते. मंगळवारी सायंकाळच्या वेळी हनुमानजींना केवड्याचं इत्र तसेच, गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण कराआणि तुम्ही स्वत: लाल रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा. संपत्ती प्राप्त करण्यासाठी हनुमानजींना प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे.

मोहरीच्या तेलाचा दिवा लावा

मंगळवारच्या दिवशी सायंकाळी घरी हनुमानजींपुढे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यानंतर चालीसाचं पठन करा. पठन केल्यानंतर थोडा प्रसाद गरीबांमध्ये वाटा त्यामुले घरावर हनुमानजींची कृपा राहील.

सर्व कामं मार्गी लागतील

मंगळवारी हनुमानजींच्या पायाजवळ तुरटी ठेवल्याने वाईट स्वप्न येत नाहीत. हनुमानजींच्या समोर बसून रामरक्षास्त्रोताचं पठन केल्याने सर्व कामं मार्गी लागतात. अडकलेली कामांची बाधा दूर होते. कर्जातूनही मुक्ती मिळते.

या नावांचा जप करा

शास्त्रांनुसार जर तुम्ही कुठल्या समस्येत असाल तर भगवान हनुमान यांचे नाव हनुमान, बजरंगबली, पवनपुत्र, अंजनी पुत्र यांचा जप करा, नक्की फळ मिळेल. मंगळवारच्या दिवशी सायंकाळी उपवास ठेवून बुंदीचे लाडू किंवा बुंदीचा प्रसाद अर्पण करा आणि लोकांना वाटा. मान्यता आहे की यामुळे मुलांसंबंधीत समस्या दूर होतात.

Do These Upay On Tuesday And Worship Lord Hanuman For Good Luck And Wealth

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

BhimKund | या कुंडात पाणी येतं कुठून, वैज्ञानिकही आजपर्यंत शोधू शकले नाही याचा स्त्रोत, जाणून घ्या भीमकुंडाबाबत सर्व माहिती

Chaitra Navratri 2021 | घट स्थापनेच्या दिवशी शुभ योग, हे उपाय करा, कौटुंबिक आणि आर्थिक समस्या सुटतील

सूर्य देवाचा जन्म कसा झाला?, जाणून घ्या पौराणिक कथा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...