BhimKund | या कुंडात पाणी येतं कुठून, वैज्ञानिकही आजपर्यंत शोधू शकले नाही याचा स्त्रोत, जाणून घ्या भीमकुंडाबाबत सर्व माहिती

भारत हा रहस्यांचा देश आहे. येथे पौराणिक काळात असे एनक गुढ रहस्य आहेत (Bhimkund Know The Surprising Things) ज्याचं कारण अजूनही वैज्ञानिक शोधू शकलेले नाहीत.

BhimKund | या कुंडात पाणी येतं कुठून, वैज्ञानिकही आजपर्यंत शोधू शकले नाही याचा स्त्रोत, जाणून घ्या भीमकुंडाबाबत सर्व माहिती
Bhimkund
Nupur Chilkulwar

|

Apr 06, 2021 | 9:00 AM

मुंबई : भारत हा रहस्यांचा देश आहे. येथे पौराणिक काळात असे एनक गुढ रहस्य आहेत (Bhimkund Know The Surprising Things) ज्याचं कारण अजूनही वैज्ञानिक शोधू शकलेले नाहीत. यापैकीच एक म्हणजे भीमकुंड. मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्याच्या बजना गावाजवळ स्थित भीमकुंड पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे. हे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. पण आजपर्यंत मोठमोठे वैज्ञानिकही याचं कारण शोधू शकलेले नाहीत की या कुंडात पाणी येतं कुठून (Bhimkund Know The Surprising Things About It Even Scientists Failed To Know From Where The Water Comes In This Kund).

आश्चर्यकारक बाब म्हणजे या क्षेत्रात पाण्याचा दूर-दूरपर्यंत कुठलाही स्रोत नाही. जर दुष्काळ पडला तरीही या कुंडातील पाणी कमी होत नाही. असं देखील म्हटल्या जातं की जेव्हा कुठली नैसर्गिक समस्या उद्भवणार असेल तेव्हा कुंडातील जलस्तर आपोआप वाढून जातो आणि लोक या संकेताला समजून पहिलेच सतर्क होऊन जातात. चला जाणून घेऊ या कुंडाबाबत –

कधीही हे पाणी खराब होत नाही

स्थानिक लोकांच्या मते कुंडातील पाण्याचा कितीही वापर केला तरी पाण्याचा स्तर सामान्यच राहतो. साधारणपणे थांबलेलं पाणी खराब होऊन जाते, पण भीमकुंडातील पाणी इतकं स्वच्छ आहे की लोक याचा वापर पिण्यासाठीही करतात.

त्सुनामीवेळी पाण्याची पातळी वाढली होती

मान्यता आहे की वर्ष 2004 मध्ये जेव्हा त्सुनामी आली होती, तेव्हा या कुंडातील पाण्याचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि कुंडातील पाण्याची हालचालही वाढली होती. त्यामुळे लोकांना हे कळालं की कुठलीतरी समस्या येणार आहे. पण कुठे येणार आहे त्याची माहिती नव्हती.

भीमने तहान भागवण्यासाठी खोदला कुंड

गोताखोरांनीही हा भीमकुंड किती खोल आहे हे जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण, त्यांना यश मिळालं नाही. कारण, याच्या तळापर्यंत कोणीही पोहोचू शकलेलं नाही. या कुंडाचा उल्लेख पुराणांमध्येही मिळतो. मान्यता आहे की अज्ञात वासादरम्यान एकदा भीमला खूप तहान लागली होती आणि त्याला कुठेच पाणी मिळालं नाही. त्यामुळे त्याने आपल्या गदाने एक गड्डा खोदला जेथून पाणी आलं आणि याप्रकारे या कुंडाचा निर्माण झाला. त्यामुळे या कुंडाला भीमकुंड या नावाने ओळखलं जातं. रहस्यमयी असल्याने लोक या कुंडाला तीर्थ मानतात आणि याचं दर्शन घेण्यासाठी येतात.

Bhimkund Know The Surprising Things About It Even Scientists Failed To Know From Where The Water Comes In This Kund

संबंधित बातम्या :

निस्वार्थ भक्ती आणि प्रेमाने देवालाही जिंकता येतं, वाचा एका खऱ्या भक्ताची अनोखी कहाणी

कृष्णाच्या यशोदा मातेला विष्णूचं खास वरदान, जाणून घ्या पौराणिक कथा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें