
मंत्र जप करणे हा देवाच्या भक्तीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. असे म्हटलं जाते की मंत्र जप पूर्ण शिस्त आणि भक्तीने केला तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. जर योग्य पद्धतीने जप केला नाही तर त्याचा प्रभाव नक्कीच कमी होऊ शकतो.
पूजा करताना आपण अगरबत्ती, धूप लावतो, देवाजवळ दिवा लावतो, आरतीही करतो. परंतु मंत्रांचा योग्यरित्या जप करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे आपण मंदिरात देवासमोर आपले डोके टेकवतो, त्याचप्रमाणे मंत्र जप करताना, बसण्याची स्थिती आणि एकाग्रता या सर्व गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. जर कोणी विहित विधींनुसार जप करत नसेल तर त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. म्हणून, इतर कोणतेही विचार मनात न ठेवता शांत वातावरणात जप करण्याचा प्रयत्न करा आणि पूर्ण भक्तीने देवाचे ध्यान करताना मंत्र जप करा. अशा प्रकारे जप केल्याने मनाला शांती मिळतेच पण पूजाही अधिक फलदायी होते.
असा मंत्र जाप करणे लाभदायी
>सर्वप्रथम, शुद्ध लोकर किंवा लहान चटईच्या आसनावर बसा
>पद्मासन किंवा सुखासनात सरळ बसा, तुमची पाठ वाकलेली नको. तुमचा चेहरा सरळ ठेवा
>प्रथम वापरण्यासाठी जपमाळ पवित्र पाण्याने धुवून शुद्ध करा आणि टिळा लावा
>मंत्र जप करण्यासाठी एक निश्चित संख्या निश्चित करा. जसं की 11, 21, 108 वैगरे
> जप करताना, तुमचे तोंड पूर्वेकडे असावे
> सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकल्प करूनच जप करा. संकल्प न करता मंत्रांचा जप केल्याने फळ मिळत नाही
> नेहमी उजव्या हातात जपमाळ धरून अंगठ्याच्या टोकाने मणी फिरवावेत
> नखे जपमाळेला स्पर्श करणार नाहीत याची काळजी घ्यावी
> प्लास्टिकचे मणी असलेली जपमाळ वापरू नये
> जप करताना, तुमचे मन भरकटवू देऊ नका आणि तुमची नजर देवावर केंद्रित ठेवा किंवा डोळे बंद करून ध्यान करा
> जपमाळ नाभीच्या खाली ठेवू नका किंवा नाकाच्या वर घेऊ नका
> जपमाळ छातीपासून समांतर असेल अशी धरा आणि जप करा
> जप करताना, सुमेरू म्हणजे जपमाळेचा सुरुवातीचा मणी ओलांडू नका, तिथे पोहोचल्यावर मंत्राची एक माळ पूर्ण झाली असा त्याचा अर्थ होतो.
> जपमाळ तुमच्या हातातून निसटून खाली पडणार नाही याची काळजी घ्या.
> जप पूर्ण झाल्यानंतर, जपमाळ काळजीपूर्वक आसनात किंवा देवाजवळ ठेवा
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)