उघडले गाभाऱ्याचे द्वार, तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश, देवीच्या अभिषेक पूजेला अलोट गर्दी

| Updated on: May 25, 2022 | 10:57 AM

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तब्बल 2 वर्षानंतर अभिषेक पुजा सुरु करण्यात आली. यामुळे भाविकात आनंदाचे वातावरण

उघडले गाभाऱ्याचे द्वार, तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश, देवीच्या अभिषेक पूजेला अलोट गर्दी
Follow us on

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (Tuljabhavani) मातेच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. भाविकांमार्फत केली जाणारी तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा तब्बल सव्वादोनवर्षानंतर आजपासून सुरू होत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तब्बल 2 वर्षानंतर अभिषेक पुजा सुरु करण्यात आली. यामुळे भाविकात आनंदाचे वातावरण होते. कोरोना लॉक डाऊन पासून तुळजाभवानी देवीचे अभिषेक बंद होते मात्र आता अभिषेक सुरु झाल्याने भाविकांना कुळधर्म कुलाचार व नवसपूर्ती करता येणार आहे. अभिषेक पूजा करण्यासाठी देवी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात एरव्ही भाविकांना प्रवेश बंदी आहे. मात्र, अभिषेक करताना भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळत असल्याने भाविक समाधानी आहेत. दूध दही मध पंचामृताचा वापर करित भाविक आई राजा उदो करित अभिषेक पूजा करित आहेत.

दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत अभिषेक पूजा होणार आहेत.तुळजाभवानी देवीला सकाळी व सायंकाळी रोज अभिषेक पूजा असते. मात्र, आता केवळ सकाळी अभिषेक पूजा सुरु होणार आहे. सायंकाळच्या अभिषेक पूजेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.नवसपूर्ती करण्यासाठी भाविक येत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

नियमावली काय आहे?

एरव्ही तुळजाभवानी गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश बंदी आहे मात्र अभिषेक पूजा वेळी भाविकांना गाभाऱ्यात जाण्याची व देवीचे गाभाऱ्यातून दर्शन पूजा करण्याची मुभा मंदिर संस्थानने दिली आहे. सकाळी 6 ते 9, अशा तीन तासांच्या या कालावधीमध्ये अभिषेक पुजा करावी.अभिषेक पूजा सुरू असताना दर्शन मंडपातील भाविकांना दर्शनात अडथळा येतो, त्यामुळे वेळेआधी अभिषेक संपल्यास गाभाऱ्यात विनाकारण गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना संस्थानकडून देण्यात आल्या आहेत. तसेच अभिषेक पुजेची वेळ संपल्यानंतर भाविकांना गाभाऱ्यात जाता येणार नाही. भेसळ नसलेले दही, दही, मध , पंचामृत यांचा वापर करुन अभिषेक पुजा करावी. तसेच त्यासाठी देऊळ कवायत नियमांचे काटकोरपणे पालन करण्यात यावे. असे नियम घालून देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांना गाभाऱ्यात प्रवेश देण्यापासून अडवल्यानंतर प्रवेशाचा मुद्या वादग्रस्त ठरला होता.अभिषेक वेळी प्रवेश दिला जात आहे त्यामुळे आता एरव्ही सुद्ध सर्व भाविकांना गाभारा प्रवेश सुरु करण्याची मागणी भाविक पुजारी यांनी केली आहे.