AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा हा एक फोटो, प्रमोशन पक्क, फेंग शुईमध्ये काय सांगितलंय?

वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंग शुई हे देखील एक चीनी वास्तुशास्त्र आहे. सुरुवातीला फेंग शुईला फक्त चीनमध्येच माण्यात होती, मात्र आता हळुहळु फेंग शुई शास्त्राचा स्विकार जगातील अनेक देशांनी केला असल्याचं पहायला मिळतं. फेंग शुई शास्त्रानुसार आपल्या घरात किंवा घराभोवती ज्या काही वस्तू असतात, त्याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो.

Feng Shui : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा हा एक फोटो, प्रमोशन पक्क, फेंग शुईमध्ये काय सांगितलंय?
Feng ShuImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 03, 2026 | 9:20 PM
Share

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार आपल्या घरात किंवा घराभोवती ज्या काही वस्तू असतात, वनस्पती असतात किंवा फोटो, मूर्ती असतात, त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक होताना दिसतो. अनेकदा असं होतं की फेंग शुई शास्त्र असेल किंवा वास्तुशास्त्र असेल त्यामध्ये एखादी मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं असतं, परंतु आपण जेव्हा तो फोटो किंवा मूर्ती ठेवण्याच्या दिशेमध्ये चूक करतो, तेव्हा मात्र त्याचा विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होताना दिसतो. त्यामुळे फेंग शुई शास्त्र आणि वास्तुशास्त्र अशा दोन्ही शास्त्रांमध्ये दिशेला अत्यंत महत्त्व आहे. फेंग शुईनुसार असे काही फोटो असतात ज्यांच्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते, जेव्हा तुम्ही हे फोटो तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये लावतात, तेव्हा तुमच्या प्रगतीच्या मार्गामधील सर्व अडथळे दूर होतात असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच एका फोटोबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जो फोटो तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवण्याचा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.

फेंग शुईनुसार जर तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या कामांमध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत. मनासारखं काम होत नाहीये. कामात मन लागत नाहीये? तुमचं प्रमोशन रखडलं आहे? तर अशावेळी तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर उगवत्या सूर्याचा फोटो ठेवू शकतात. उगवत्या सूर्याचा फोटो डेस्कवर ठेवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की या फोटोचं तोंड हे नेहमी पूर्वेला असावं. फेंग शुईमध्ये उगवत्या सूर्याला अत्यंत शुभ माणण्यात आलं आहे. हा असत्याचा सत्यावर विजय आणि दुख:चा शेवट तसेच प्रगतीची सुरुवात या गोष्टीचं प्रतिक माण्यात येतो. त्यामुळे ऑफिसच्या डेस्कवर नेहमी उगवत्या सूर्याचा एक फोटो असावा असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

तुम्ही या देखील मूर्ती ठेवू शकतात – फेंग शुई शास्त्रानुसार तुम्ही तुमच्या ऑफीसच्या डेस्कवर उगवत्या सूर्यासोबतच हत्तीचा फोटो, किंवा मूर्ती तसेच धावणाऱ्या घोड्यांची मूर्ती किंवा फोटो देखील ठेवू शकतात. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक आडचणी दूर होतात, असं फेंग शुई शास्त्रामध्ये म्हटलं आहे. धावणारे घोडे हे वेगवान प्रगतीचं प्रतिक माण्यात आले आहेत, तर हत्तीची मूर्ती ही आर्थिक स्थिरतेचं प्रतिक माण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल