AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमवार ते रविवार… कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? जाणून याचं महत्त्व…

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व आहे. यामध्ये प्रेत्येक रंगाचं देखील महत्त्वा सांगितलं आहे. तर सोमवार ते रविवार पर्यंत कोणत्या रंगाचे कपडे घातले पाहिजे... याबद्दल देखील ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे... तर जाणून घ्या याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार...

सोमवार ते रविवार... कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? जाणून याचं महत्त्व...
| Updated on: Sep 28, 2026 | 10:12 AM
Share

ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे… सांगायचं झालं तर, ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, आपण जे अन्न खातो, झोपतो आणि दैनंदिन दिनचर्या यांसोबतच, आपण जे कपडे घालतो त्यांच्या रंगांनाही विशेष महत्त्व आहे. प्रत्येक रंगाचा आपल्या विचारांवर, मनावर आणि ऊर्जेवर वेगवेगळा प्रभाव पडतो…. असं देखील मानलं जातं आणि याच कारणामुळे , आठवड्याच्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घातल्यास शुभ परिणाम मिळतील आणि कोणते रंग टाळावेत, याबद्दल काही ज्योतिषशास्त्रीय सल्ले आहेत. तर जाणून घेऊया की कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत.

सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी हलक्या रंगाचे कपडे घालणं चांगलं मानलं जातं. तुम्ही पांढरे, क्रीम, फिकट गुलाबी, फिकट आकाशी आणि फिकट पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता. असं म्हटलं जातं की, या दिवशी काळे आणि अतिशय भडक गडद रंग टाळणं चांगले असतं. काळा रंग पवित्र दिवशी घालत देखील नाही.

मंगळवार हा भगवान हनुमानाला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी लाल, केशरी, नारंगी आणि पिवळ्या रंगांसारखे तेजस्वी रंग परिधान करणं शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, हे रंग उत्साह आणि ऊर्जेचे प्रतीक मानलं जातात.

बुधवार हा भगवान गणेश आणि बुध ग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो. भगवान गणेशाला अत्यंत प्रिय असलेल्या दुर्वांचे प्रतीक असलेल्या हिरव्या रंगाला या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे, हिरव्या किंवा तत्सम रंगांचे कपडे परिधान करता येतात.

गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित दिवस मानला जातो. पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, भगवान विष्णूला पिवळा रंग खूप आवडतो. त्यामुळे, गुरुवारी पिवळे कपडे घालणं शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की, पिवळे कपडे घातल्याने सकारात्मकता येते.

शुक्रवार हा शुक्राचा दिवस मानला जातो. हा दिवस देवी लक्ष्मीलाही समर्पित आहे. त्यामुळे, शुक्रवारी लाल रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रीय मतानुसार, तुम्ही थोडे चमकदार किंवा आकर्षक कपडे घालू शकता. लाल रंगासोबत तुम्ही फिकट रंगाचे कपडेही घालू शकता.

शनिवार हा शनिदेवाला समर्पित दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, निळा आणि काळा रंग शनिदेवाशी संबंधित आहेत. त्यामुळे, शनिवारी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत असं मानलं जातं. या दिवशी गडद निळा रंगही शुभ मानला जातो.

रविवार हा सूर्यदेवाला समर्पित दिवस मानला जातो. लाल, नारंगी आणि पिवळा हे रंग सूर्याचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे, ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी या रंगांचे कपडे घालणं शुभ मानलं जातं. विशेषतः, लाल, केशरी आणि नारंगी यांसारखे तेजस्वी रंग परिधान केले जाऊ शकतात.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....