
आपल्या आयुष्यात ग्रह आणि नक्षत्रांना भरपूर महत्त्व असतं. ज्योतिष शास्त्रात सर्व ग्रह आणि नक्षत्रांचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्र हे मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ आणि अशुभ योग बनवतात, ज्यामुळे त्याच्या आयुष्यावर त्याचा प्रभाव बघायला मिळतो. शुभ योगाची गोष्टी करायची तर ज्योतिष शास्त्रात गजकेसरी योगाला प्रचंड शुभ आणि प्रबळ मानलं जातं. ज्या व्यक्तीच्या आयुष्यातच हा योग जुळून येतो त्या व्यक्तीच्या हाती हत्ती इतकं बळ आणि त्यासह प्रचंड धनसंपत्ती प्राप्त होते.
गजकेसरी योग हा सर्व राजयोगांमध्ये सर्वाधिक फलदायी योग असतो. जेव्हा संपत्ती, भविष्य, अपत्य आणि पती यांचा कारक मानला जाणारा गुरु आणि मन, बुद्धी, भावना, मातृत्व, जनता आणि सुख कारक मानला जाणारा चंद्र एकत्र येऊन युती बनवतात, तेव्हा गजकेसरी योद तयार होतो. ज्या राशींच्या लोकांच्या कुंडलीत गजकेसरी योग बनतो ते प्रत्येक क्षेत्रात यशाच्या आणि प्रगतीच्या पायऱ्या चढत जातात.
गजकेसरी योग बनल्यास व्यक्तीला शिक्षा प्राप्त होतेच त्यासोबत प्राविण्यदेखील मिळते. हा योग आपल्याला धन, संपत्ती आणि भाग्य प्रदान करतो. गजकेसरी योग बनल्यास करियरमध्ये प्रगती आणि व्यवसायातही चांगलं यश मिळतं.
गजकेसरी योग आपल्याला समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा देतो. तसेच व्यक्तीचं वैवाहिक आयुष्य सुखी होतं. हा योग व्यक्तीला चांगलं आरोग्यदेखील प्रधान करतं.
हा योग व्यक्तीला बुद्धीमान बनवतो. तसेच व्यक्तीची आर्थिक स्थिती प्रचंड मजबूत करतो. या योगामुळे व्यक्तीला आयुष्यात वेगवेगळ्या संधी मिळतात.
एक महत्त्वाचं म्हणजे, हा योग आपल्या आयुष्यात यावा यासाठी व्यक्तीची जन्मकुंडली महत्त्वाची आहे. हा योग वृषभ, कर्क, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी जास्त शुभ असतो.
(टीप : या लेखात देण्यात आलेली माहिती उपलब्ध स्त्रोतांच्या आधारावर देण्याच आली आहे. टीव्ही 9 मराठी त्याची पुष्टी करत नाही. कोणताही सल्ला घेण्यासाठी आपण तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊ शकता.)