Pitru Paksha 2026 : पितृपक्षात कोणत्या वस्तूंचे दान कराल, ज्यामुळे प्रसन्न होतात पूर्वज, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही
Pitru Paksha 2026 : पितृपक्षात आपण पूर्वजांच्या आठवणीत अन्न दान करतो. अनेत जण पंडीतांना बोलावून पूजा करतात, पण फार कोणाला माहिती नसतं की, पितृपक्षात कोणत्या वस्तूंचे दान करायला हवं... ते घ्या जाणून...

Pitru Paksha 2026 : मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. हिंदू धर्मामध्ये पितृ पक्षाला विशेष महत्त्व दिले जाते. पितृ पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही… अशी देखील मान्यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत पवित्र, संवेदनशील मानला जातो. या काळात आपण आपल्या पूर्वजांप्रति आणि दिवंगत आत्म्यांप्रति आपली श्रद्धा आणि आदर व्यक्त करतो. पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि ते आपल्या वंशजांनी दिलेले पाणी, अन्न आणि दान स्वीकारतात… असं देखील म्हणतात. फार कमी लोकांना माहिती असेल की, या काळात कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजे… या वस्तू दान केल्याने घरात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी.
पितृपक्षात अन्नदानाला महत्त्वाचे मानले जाते. गहू, तांदूळ, डाळी, पीठ आणि इतर खाद्यपदार्थ गरजू लोकांना दान केले जातात. अन्न ही जीवनावश्यक गरजांपैकी एक आहे, असंही मानलं जातं. त्यामुळे, गरजू लोकांना अन्न किंवा खाद्यपदार्थ देणं हे एक पुण्यकर्म मानलं जातं.
पितृपक्षात वस्त्रदान करण्याचीही एक परंपरा आहे. या काळात गरजू व्यक्तीला वस्त्रदान केल्यास मोठं पुण्य प्राप्त होतं. या मान्यतेनुसार, आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करणं हे पूर्वजांवरील श्रद्धा व्यक्त करण्याचे एक माध्यम मानलं जातं.
श्राद्ध आणि तर्पण परंपरेत काळ्या तिळाला विशेष महत्त्व दिले गेलं आहे. अनेक ठिकाणी पितृकर्माच्या वेळी काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे. पितृपक्षातही काळ्या तिळाचे दान केलं जातं. असा विश्वास आहे की तिळाचा संबंध पितृकर्माशी आहे आणि श्राद्धाशी संबंधित धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर केला जातो.
पितृपक्षात गूळ दान करणं देखील शुभ मानलं जातं. गरजू व्यक्तीला अन्न किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत गूळ दिला जाऊ शकतो. धार्मिक श्रद्धेनुसार, गूळ हा एक शुभ आणि पुण्यकारक पदार्थ मानला जातो. त्यामुळे, पितृपक्षात आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार गूळ दान करण्याची प्रथा आहे.
पितृपक्षात तूप दान करण्याची एक धार्मिक परंपरा देखील आहे. पूजा आणि हवन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुपाचा वापर केला जातो. या काळात, गरजू किंवा पात्र व्यक्तीला तूप दान केल्याने देखील पुन्य प्राप्त होतं.
पितृपक्ष 2026 कधी सुरू होईल?
पंचांगानुसार, 2026 मध्ये, शनिवार, 26 सप्टेंबर रोजी पौर्णिमेला पितृपक्ष सुरू होईल, ते शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 रोजी पितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त होईल.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
